वामन हरी पेठे ज्वेलर्सने "नेकलेस महोत्सव" लाँच केला
वामन हरी पेठे ज्वेलर्सने "नेकलेस महोत्सव" लाँच केला
मुंबई/बोरिवली, सप्टेंबर, २०२३: वामन हरी पेठे ज्वेलर्स त्यांच्या बोरिवली शोरूमचा २० वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. मुंबईत १९०९मध्ये डब्ल्यूएचपी ज्वेलर्सची स्थापना झाली आणि बोरिवलीतील चोखंदळ आणि सौंदर्याविषयी जागरूक ग्राहकांना सेवा देणारे सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांमधील एक विश्वासार्ह नाव बनले आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स हे आपल्या आकर्षक आणि उत्कृष्ट कलाकुसरीच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी ओळखले जाते.
वामन हरी पेठे ज्वेलर्सने आपल्या बोरिवली शाखेच्या २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सोने आणि हिऱ्यांच्या नेकलेसचा भव्य संग्रह असलेला "नेकलेस महोत्सव" आयोजित केला आहे. लोकप्रिय तरुण अभिनेत्री हृता दुर्गुळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रकारच्या डिझाईन्स एका छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कलेक्शनमध्ये कलात्मकरित्या घडवलेल्या चित्ताकर्षक सोने आणि हिऱ्यांच्या नेकलेसचा समावेश असेल. अँटिक, कलकत्ता, मंदिर, कोल्हापुरी या आणि अशा विविध प्रकारच्या नेकलेस संग्रहाचा या महोत्सवात समावेश आहे.
९ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत ग्राहकांना नेकलेस घडणावळीवर विशेष २० % सूट मिळू शकते. तेंव्हा ग्राहकांना विनंती आहे की ही सुवर्णसंधी चुकवू नका.
वामन हरी पेठे ज्वेलर्सचे भागीदार श्री आशिष पेठे म्हणाले की, डब्ल्यूएचपी ज्वेलर्स केवळ दागिन्यांमध्येच नव्हे तर व्यवहारातही शुद्धता, उत्तम दर्जा, कारागिरी आणि उत्कृष्ट डिझाइनसाठी म्हणून ओळखले जाते. आमच्या मौल्यवान ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि अनुभव प्रदान करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यामुळेच वामन हरी पेठे हे दागिन्यांशी संबंधित सर्व गरजांसाठी एक स्टॉप शॉप आहे.
वामन हरी पेठे ज्वेलर्सचा अलीकडेच डोमेस्टिक जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलने "भारतातील पसंतीचा किरकोळ विक्रेता" म्हणून गौरव करण्यात आला आणि रेडिओ सिटीद्वारे ३० उच्चभ्रू व्यावसायिकांच्या "३० पॉवर लिस्ट" यादीत समावेश करण्यात आला
श्री.विश्वनाथ पेठे म्हणाले सचोटी, वस्तू, व्यवहार आणि वर्तनातील शुद्धता याभोवती आमच्या संस्थेचे ब्रीदवाक्य गुंफले गेले आहे. ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून आमच्या भक्कम पायाचा आधारस्तंभ बनला आहे. संस्थेने २००० मध्ये "सोनरी क्षणांचे सोबती" या घोषवाक्याची संकल्पना रुजली आणि आणि २००१ मध्ये ती अस्तित्वात आली.
ग्राहक आपल्या आयुष्यातील विशेष क्षण मग ते लग्न, वाढदिवस असो की वर्धापनदिन साजरा करताना नेहमी भेट देतात याची डब्ल्यूएचपीला जाणीव आहे आणि याच सोनेरी क्षणांची वामन हरी पेठे ज्वेलर्स स्वतःला भागीदार समजते.
थोडक्यात सांगायचे तर, वामन हरी पेठे ज्वेलर्स येथील "नेकलेस महोत्सव" विशेष ऑफरसह आकर्षक आणि उत्कृष्ट कलाकुसर केलेल्या सोन्याचे आणि हिऱ्यांचे नेकलेस देण्याचे वचन देतो. नवीनतम डिझाईन्स आणि स्पर्धात्मक किमतींसाठी भेट देजाण्याचे ठिकाण आहे, जे परंपरा आणि आधुनिकतेचे परिपूर्ण मिश्रण देते. वामन हरी पेठे ज्वेलर्स दागिन्यांच्या जगात नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज आहे.
Comments
Post a Comment