भारतातील मसाले आपल्या व्यापारी सामर्थ्यासोबतच समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतात: पीयूष गोयल

भारतातील मसाले आपल्या  व्यापारी  सामर्थ्यासोबतच  समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतात: पीयूष गोयल

भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक  कॉरिडॉर म्हणजे गतकाळातील मसाल्यांच्या मार्गाचे वैभव परत आणण्याची संधी

भारतीय मसाल्यांची गाथा सर्वत्र कथन करायला हवी आणि त्यावर लेखनही  व्हायला हवे

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जागतिक मसाला परिषद 2023 ला केले संबोधित; वर्ष 2030 पर्यंत 10 अब्ज डॉलर्स मसाला  निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मसाले उद्योगातील भागधारकांनी  एकत्र काम करण्याचे केले आवाहन

नवीमुंबई,वाशी दि.16 सप्टेंबर 2023ः मसाले भारताला एकजुट  करतात. देशात मसाल्यांचे स्थान महत्त्वपूर्ण असून  आपल्या  व्यापारी  शक्तीसोबतच  समृद्ध पारंपारिक संस्कृती आणि वारसा ते प्रतिबिंबित करतात. भारतीय मसाल्यांबाबत  जगभर असलेले जुने आकर्षण आपल्याला पुन्हा निर्माण करायचे आहे. भारत आता दुसऱ्या स्थानावर संतुष्ट राहू शकत  नाही. आपल्याला मसाला उद्योगात जागतिक अग्रणी  बनायचे आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगग्राहक व्यवहारअन्न व  सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.  नवी मुंबई येथे 15 ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मसाला परिषदेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात गोयल यांच्या हस्ते  2019-2020 आणि 2020-2021 साठी मसाले निर्यात उत्कृष्टता पुरस्कार  प्रदान करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गोयल यांनी निर्यातीत मूल्यवर्धनाद्वारे मसाले उद्योगाचा विस्तार करण्याच्या गरजेवर भर दिला. सध्याची  4 अब्ज डॉलर्स मसाला निर्यात वर्ष 2030 पर्यंत 10 अब्ज डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगातील भागधारकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या बाजारपेठा विस्तारित करण्यासोबत वाढीव मूल्यवृध्दीच्या माध्यमातून नव्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी  सर्वांनी आपली ऊर्जा केंद्रित करून  एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहेअसेही   गोयल यांनी सांगितले.  जगभरात मसाल्यांचा वाढत्या वापराला चालना देण्यासाठी  जगभरात पसरलेल्या  35 दशलक्ष भारतीय वंशाच्या लोकांना ब्रँड ॲम्बेसेडर बनवावेअसे गोयल यांनी सुचवले.

मसाला उद्योगाला सर्वसमावेशकतेसाठी प्रयत्न करण्याचे  आणि पर्याप्त  उत्पादनासाठी शेतकर्‍यांना पाठबळ मिळेलयाकडे लक्ष पुरवण्याचे आवाहन गोयल यांनी मसाला उद्योगाला केले.  गोयल यांनी भारतीय मसाल्यांसाठी प्रमाणित ब्रँड व्हॅल्यू तयार करण्याच्या महत्त्वावरही भाष्य केले.

जगाच्या इतर भागातून आलेल्या प्रतिनिधींच्या  सहभागामुळे आपल्याला  आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.    यशस्वी व्यवसाय सहकार्याला मूर्त रूप देण्यासोबतच  भारतीय आदरातिथ्याचा आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी जगभरातून आलेल्या प्रतिनिधींना  केले.

गोयल यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.  यापुढेही ते आपली  उल्लेखनीय कामगिरीउच्च दर्जा कायम ठेवतील आणि या क्षेत्रात भविष्यात जगभरात भारताची   ओळख प्रस्थापित करण्यासाठी  उच्च मानक  स्थापित करतीलअशी आशा व्यक्त केली.

सात वर्षांच्या कालावधीनंतर  मसाला परिषद  आयोजित केल्याबद्दल गोयल यांनी  मसाले  मंडळाचे अभिनंदन केले आणि वर्ष 2024 मध्ये दिल्ली येथे जागतिक दर्जाचे प्रदर्शनपरिसंवाद आणि परिषद आयोजित करण्याची विनंती  केली.    जगाला भारताची या क्षेत्रातील  क्षमता पाहण्याची संधी मिळावी यासाठी या क्षेत्रातील सर्व उद्योजकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याची सूचना गोयल यांनी केली.

गोयल यांनी नमूद केले कीही परिषद आयोजित करण्यासाठी भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या दरम्यानच्या काळासारखी  चांगली वेळ मिळाली नसती. "भारत - मध्य पूर्व - युरोप आर्थिक कॉरिडॉरचा शुभारंभ हा भूतकाळातील मसाल्याच्या  मार्गाप्रमाणेच आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर जागतिक नेत्यांसह सुरू केलेल्या या नवीन उपक्रमाकडे आपण आदर्श म्हणून पाहिले पाहिजे. जुन्या मसाले मार्गाचे वैभव परत आणण्याची आपल्यासाठी ही योग्य संधी आहे. भारताचा स्वाद आणि देशाचे वैविध्य  साजरे करण्याची ही नामी संधी आहे. चला जागतिक बाजारपेठा काबीज करूया.उत्सवांशिवाय जसे जीवन अपूर्ण आहेतसेच मसाल्यांशिवाय भोजन देखील अपूर्ण आहे. मसाल्यांना आपण जगभरातील भोजनाचा एक आवश्यक घटक बनवले पाहिजे. भारतीय मसाल्यांच्या महतीबाबत जगभर बोलले गेले पाहिजे आणि लिहिले गेले पाहिजे. आपल्या आजीच्या बटव्यातील उपाय जगभरात कसे वापरले जाऊ शकतात ते पाहूया. भारताला प्रथम पसंती असलेला मसाल्यांचा स्त्रोत बनवूया आणि संपूर्ण जगाचे कल्पनाविश्व काबिज करु या. जर आपण सर्वांनी एक संघ म्हणून एकत्र काम केले तर आपण वाणिज्य आणि निर्यातीच्या क्षेत्राची लज्जत वाढवू शकतो. आपल्या मसाल्यांच्या जादूने जगाला मोहित करू या आणि ही जादू भावी पिढ्यांसाठी जतन करूया असे आवाहन मंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

याप्रसंगी भारत सरकारच्या अतिरिक्त सचिव आणि मसाले मंडळाचे अध्यक्ष अमरदीप सिंग भाटियाभारत सरकारचे अतिरिक्त सचिव आणि परराष्ट्र व्यापार महासंचालक संतोष कुमार सारंगीमसाला मंडळाचे सचिव डी साथियानमसाले मंडळाचे संचालक (विपणन) बसिष्ठ नारायण झामसाले उद्योग व्यावसायिकउत्पादकव्यापारीप्रक्रियकनिर्यातदार आणि जगभरातील नियामक उपस्थित होते.

उद्घाटन समारंभानंतर 'स्पाईस रिव्होल्यूशन - प्रमोटिंग व्हॅल्यू ॲडिशन इन ग्लोबल स्पाईसेस ट्रेडया पुस्तकाच्या प्रकाशनासहविविध उत्पादनांचा प्रारंभव्यावसायिक चर्चा आणि तांत्रिक चर्चांची सत्रे झाली. या कार्यक्रमाने विविध कंपन्यांना मसाला उद्योगाशी संबंधित नाविन्यपूर्ण उत्पादनेब्रँड आणि सेवांवर प्रकाश टाकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता पाहुण्यांसाठी मनोरंजक अनुभव ठरणाऱ्या कुकरी शोने झाली. परिषदेच्या 14 व्या आवृत्तीमध्ये धोरणकर्तेनियामक संस्थामसाले व्यापार संघटनासरकारी प्रतिनिधी आणि विविध राष्ट्रांतील तांत्रिक तज्ञ यासारख्या विविध सहभागींना एकत्र येण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात भारत आणि जगभरातून 1000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. जगभरातील मसाल्यांच्या व्यापारातील समस्या आणि संधी यावर चर्चा करण्यासाठी हे सहभागी एकत्र आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight