'सन मराठी’ची ‘सावली होईन सुखाची’..

'सन मराठी’ची ‘सावली होईन सुखाची’ या मालिके मध्ये प्रमुख भूमिका साकारत असलेली 


गौरी म्हणजे सीमा कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज

सीमा कुलकर्णी ही बॉलिवूड आणि मराठी चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल,थिएटर आर्टिस्ट आसून तिने अनेक फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि नाटकांमध्ये काम केलीली आहेत.तसेच तिची सध्याची मालिका हि सन मराठी वरील सावली होईन सुखाची या मालिका मध्ये ती प्रमुख भूमिकेत गौरी हि पात्र साकारत आहे.  
सन टीव्ही नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीने नेहमीप्रमाणे यावेळी देखील एका नाजूक विषयात हात घातला आहे. ‘सोहळा नात्यांचा’ असं ब्रीदवाक्य असणारी ‘सन मराठी’ एक नवीन प्रेमाची कथा ‘सावली होईन सुखाची’  सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता आपल्या भेटीस येते. प्रेमाच्या परिभाषा वेगळ्या असतात. कोणावर जीव जडला पाहिजे हे ठरवलं जात नाही ते आपसूक होऊन जातं. ‘सन मराठी’ वाहिनी ‘सावली होईन सुखाची’ ही नवीन मालिका घेऊन आली आहे , ज्यामध्ये कुटुंबाची गोष्ट तर आहेच पण त्यासोबत मोलकरीण आणि अनाथ मुलीची देखील गोष्ट दाखवण्यात आली आहे.

ही गोष्ट आहे श्रीमंत कुटुंबाची, कुटुंब आर्थिकदृष्ट्या कितीही परिपूर्ण असलं तरी घरातील सदस्यांना एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, माया काही वाटत नाही. जणू त्या घराने कधी प्रेम हे पाहिलंच नसावं. तसेच त्या श्रीमंत घराण्यातील एक सदस्य जो भूतकाळातील एका घटनेमुळे वाईट सवयींच्या आहारी गेला आहे, त्याच्यामुळे घरात सकारात्मक असं वातावरण नाही. पण त्याच घरात एक मोलकरीण आणि एक अनाथ मुलगी यांचा प्रेमळ स्वभाव देखील वावरतोय. कदाचित त्या दोघींच्या मनमिळावू स्वभावामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकतीच या मालिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रोमोमध्ये मालिकेचा नायक रोनक शिंदे ज्याला वाईट सवयी लागल्या आहेत आणि घरातील सर्वजण त्याच्या विरोधात आहेत आणि मालिकेची नायिका सीमा कुलकर्णी जी मोलकरणीच्या भूमिकेत दिसली आहे, त्यांच्यातील अबोल भावना पाहायला मिळाल्या. एखाद्यावर ठरवून प्रेम केलं जात नाही, ते आपसूक होतं, असंच काहीसं त्यांचं नातं आहे. त्या दोघांना एकमेकांची सोबत मिळेल का, हे लवकरच कळेल.
रोनक शिंदे, सीमा कुलकर्णी यांच्यासह आरंभी उबाळे, रुतविज कुलकर्णी, धनंजय वाबळे, सुप्रिया विनोद, एकनाथ गिते, नैना सामंत, यश पेडणेकर, ज्ञानेश्वरी देशपांडे, अवनिश आस्तेकर, श्वेता मांडे, निशा कथावते, निलेश गावरे, पूनम चव्हाण, सलमान तांबोळी आणि आशिष चौधरी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

रतिश तगडे, पदमनाभ राणे आणि महेश बेंडे निर्मित, निशांत सुर्वे दिग्दर्शित ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेची कथा-पटकथा महाबळेश्वर नार्वेकर यांनी लिहिले असून विशाल कदम यांनी संवाद लिहिले आहेत. मालिकेची झलक पाहिल्यावर प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न पडला असेल की घरची मोलकरीण, होईल का साता जन्माची सोबतीण? जाणून घेण्यासाठी नक्की पाहा नवी मालिका 'सावली होईन सुखाची'  सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight