'बिग बॉस नंतरची ‘दिल दोस्ती दिवानगी’

 'बिग बॉस नंतरची दिल दोस्ती दिवानगी

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे 'बिग बॉस मराठी'. या कार्यक्रमाचे चार ही सीझन चांगलेच गाजले. बिग बॉस गाजवलेली मंडळी आता दिल दोस्ती दिवानगी करताना दिसणार आहेत. आपल्या दमदार अभिनयाने वेगवेगळ्या भूमिका लीलया साकारणारे अभिनेते विद्याधर जोशीअभिनेत्री सुरेखा कुडची, ग्लॅमरस अभिनेत्री वीणा जगताप आणि स्मिता गोंदकर यांचा दिल दोस्ती दिवानगी हा मराठी चित्रपट ६ ऑक्टॉबेरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या दिल दोस्ती दिवानगी चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

 

विद्याधर जोशी मायकेल ब्रिगेन्झा तर सुरेखा कुडची मिस मेरी या कॅथलिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत,  तर स्मिता गोंदकर रिया आणि वीणा जगताप श्रियाच्या ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहे. मैत्रीप्रेम त्यानंतरचं आयुष्य यांत अडकलेल्या प्रेमवीरांची कथा दिल दोस्ती दिवानगी चित्रपटात मांडण्यात आली आहे. या प्रेमकथेच्या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टीयाचा रंजक अनुभव देणारा हा चित्रपट असून प्रेक्षक यात नक्कीच गुंतून जातील असा विश्वास हे चौघंही व्यक्त करतात.  या चौघांसोबत कश्यप परुळेकरचिराग पाटीलअतुल कवठळकरतीर्था मुरबाडकरतपन आचार्यदुर्वा साळोखेकंवलप्रीत सिंग, प्रदीप वेलणकरविजय पाटकरस्मिता जयकर हे कलाकार ही चित्रपटात दिसणार आहेत.

 

'दिल दोस्ती दिवानगी चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. कथापटकथासंवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते,  वैशाली सामंत,सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचाइ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत

 

'दिल दोस्ती दिवानगी हा मल्टीस्टारर चित्रपट ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO