तेजस देऊस्करांच्या आगामी हॉरर फँटसी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न!
तेजस देऊस्करांच्या आगामी हाँरर फँटसी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न! सोनाली कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन प्रयोग होत असतानाच, आता प्रेक्षकांना भय, कल्पनारम्यता आणि गूढतेचा अनोखा अनुभव देणाऱ्या हॉरर फँटसी चित्रपटाची उत्सुकता लागणार आहे. ‘बकेट लिस्ट’ आणि ‘देवमाणूस’ या चित्रपटांतून आपल्या दिग्दर्शनाची वेगळी छाप उमटवणारे तेजस प्रभा विजय देऊस्कर आता एका अनोख्या कथाविश्वातून प्रेक्षकांना भेटायला सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी हॉरर फँटसी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला असून लवकरच या चित्रपटाचे नावही जाहीर करण्यात येईल. यात सोनाली कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हॉरर आणि फँटसी या दोन जॅानरची सांगड घालत प्रेक्षकांना नेमका कोणता अनुभव मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत अधिक माहिती समोर आलेली नसल्याने या नव्या विश्वातील रहस्य उलगडण्याची प्रतीक्षा आता प्रेक्षकांना करावी लागणार आहे. भयाच्या वातावरणासोबत कल्पनाशक्तीला नवी दिशा देणारा हा चित्रपट मराठी सिनेमातील वेगळ्या...