एनपीएसटीकडून आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्नात वार्षिक ५० टक्‍के वाढीची नोंद

एनपीएसटीकडून आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्नात वार्षिक ५० टक्‍के वाढीची नोंद; निव्वळ नफ्यात ३४ टक्‍के वाढ; आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत एकूण उत्पन्न ६० टक्क्यांनी वाढून १३४ कोटी रुपयांवर पोहोचले

मुंबई, नोव्हेंबर १२, २०२६: नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड (एनपीएसटी) या डिजिटल बँकिंग आणि पेमेंट्स तंत्रज्ञान कंपनीने आज ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे अलेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीमधील एकत्रित कामगिरी

या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न ७२.९५ कोटी रुपये राहिले. यामध्ये आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीतील ४८.६८ कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक आधारावर ५० टक्‍के वाढ झाली आहे आणि आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीतील ६१.४२ कोटी रुपयांच्या तुलनेत तिमाही आधारावर १९ टक्‍के वाढ नोंदवली गेली आहे. कामकाजातून मिळणारा महसूल वार्षिक ४५ टक्‍के आणि तिमाही २० टक्क्यांनी वाढून ६७.७४ कोटी रुपयांवर पोहोचला.

या तिमाहीत एबिटा २३.६० टक्‍के मार्जिनसह १५.९९ कोटी रुपये राहिला, ज्यामध्ये वार्षिक आधारावर १७ टक्‍के आणि तिमाही आधारावर १५ टक्‍के वाढ झाली. करपूर्व नफा वार्षिक २६ टक्‍के आणि तिमाही १७ टक्क्यांनी वाढून १६.९४ कोटी रुपये झाला.

कंपनीचा निव्वळ नफा १३.२१ कोटी रुपये नोंदवला गेला, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीतील ९.८४ कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक आधारावर ३४ टक्‍के आणि मागील तिमाहीतील ११.०५ कोटी रुपयांच्या तुलनेत तिमाही आधारावर २० टक्‍के अधिक आहे. या तिमाहीसाठी ईपीएस ६.३४ रुपये राहिले, जे मागील वर्षीच्या ५.०० रुपयांच्या तुलनेत वार्षिक आधारावर २७ टक्‍के आणि मागील तिमाहीतील ५.२६ रुपयांच्या तुलनेत तिमाही आधारावर २१ टक्‍के अधिक आहे.

आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीमधील एकत्रित कामगिरी

आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत एकूण उत्पन्न १३४.३७ कोटी रुपये राहिले, जे आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीतील ८३.७६ कोटी रुपयांच्या तुलनेत ६० टक्‍के अधिक आहे. कामकाजातून मिळणारा महसूल ५५ टक्क्यांनी वाढून १२४.२२ कोटी रुपये झाला. एबिटा २७ टक्क्यांनी वाढून २९.८४ कोटी रुपये, तर करपूर्व नफा ३६ टक्क्यांनी वाढून ३१.४३ कोटी रुपये राहिला. निव्वळ नफा मागील वर्षाच्या याच कालावधीतील १७.०६ कोटी रुपयांच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी वाढून २४.२६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ईपीएस मागील वर्षीच्या ८.७० रुपयांच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी वाढून ११.६३ रुपये राहिले.

या कामगिरीबाबत मत व्यक्त करत एनपीएसटीचे को-फाउंडर आणि सीईओ दीपक चंद ठाकूर म्हणाले, "टीएसपी व्यवसायासाठी आखलेल्या आमच्या धोरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत आणि आम्ही केवळ भारतात नव्हे, तर जागतिक बाजारपेठेतही आमची उपस्थिती दर्शवत आहोत. केंद्रित टीम धोरण आणि डिजिटल पेमेंट्स व बँकिंग क्षेत्रातील वाढीच्या प्रबळ संधींमुळे आम्हाला टीएसपी व्यवसायात आणखी सुधारणा आणि वाढ अपेक्षित आहे. बँक-इन-अ-बॉक्स सबस्क्रिप्शन-आधारित मॉडेल म्हणून उभारण्याच्या आमच्या योग्य वेळेवरील निर्णयामुळे लहान आणि मध्यम आकाराच्या बँकांचे मोठे क्षेत्र आमच्यासाठी खुले झाले आहे. तसेच, जागतिक बाजारपेठेवर सुरुवातीलाच विश्वास दाखवण्याचा आमचा निर्णय आता फलदायी ठरत आहे, जिथे संपूर्ण जग भारताच्या डिजिटल पेमेंट्स यशोगाथेकडे अधिकाधिक आशेने पाहत आहे. रेगटेक क्षेत्रात डीपीडीपी अनुपालन आणि जोखीम इंटेलिजन्स क्षमता निर्माण करण्याच्या आमच्या पावलामुळे संधी आणखी विस्तारत आहेत आणि आगामी तिमाहींमध्ये त्यातून चांगले परिणाम मिळतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे."

एनपीएसटीचे को-फाउंडर आणि जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर आशिष अग्रवाल म्हणाले, "डिजिटायझेशनसाठी भारताचा नियामक पुढाकार आणि डिजिटल व्यवहारांद्वारे अधिक पारदर्शकता आणण्यावर असलेला सरकारचा भर एनपीएसटीसारख्या पेमेंट तंत्रज्ञान कंपन्यांसाठी मोठ्या नवीन संधी निर्माण करत आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये एकट्या यूपीआयद्वारे विक्रमी २५.४७ अब्ज व्यवहार झाले, जे वार्षिक आधारावर २३ टक्‍के अधिक आहेत. या प्रमाणासोबत फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत: २०२५ मध्ये आर्थिक सायबर फसवणुकीच्या तक्रारींमध्ये जवळपास २५ टक्‍के वाढ झाली आणि आरबीआय आता रिअल-टाइम पेमेंटसाठी नवीन सुरक्षा उपाययोजनांचा विचार करत आहे. अधिक प्रबळ पेमेंट नियंत्रण, आर्थिक संस्थांसाठी फसवणूक-जोखीम रोखणारे कडक नियम आणि डीपीडीपी बंधनांमुळे डिझाइनद्वारे अनुपालन अपरिहार्य झाले आहे. एनपीएसटी एकाच व्यासपीठावर पेमेंट पायाभूत सुविधा आणि एआय-आधारित फसवणूक नियंत्रण यंत्रणा एकत्र आणते, ज्यामुळे संस्थांना डिजिटल व्यवहार सुरक्षितपणे वाढवण्यास मदत होते. या भूमिकेमुळे बाजारपेठेत आमची उपस्थिती सातत्याने वाढत आहे."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable