केएफसी इंडिया घेऊन येत आहे झणझणीत नव्या कोरियन डंक्ड रेंजचा स्वाद!
केएफसी इंडिया घेऊन येत आहे झणझणीत नव्या कोरियन डंक्ड रेंजचा स्वाद!
~ गोचुजांगचा तिखटपणा, भाजलेल्या तीळांचा खमंग स्वाद आणि उमामीची खास चव! केएफसी च्या खास क्रिस्पी चिकनला आता मिळणार अस्सल कोरियन फ्लेवर्सचा भन्नाट तडका! ~
~ कोरियन डंक्ड रेंजमध्ये केएफसी चे आवडते पदार्थ जसे की झिंजर बर्गर, बोनलेस चिकन स्ट्रिप्स, विंग्स आणि बरेच काही, फक्त ₹89 पासून उपलब्ध! ~
राष्ट्रीय,नोव्हेंबर 2026: या सणासुदीच्या हंगामात आता चवीला मिळणार एकदम झक्कास सॉसी ट्विस्ट!
केएफसी इंडिया घेऊन आले आहे नवी कोरियन डंक्ड रेंज, ज्यामध्ये केएफसी च्या खास कुरकुरीत चिकनला मिळणार आहे कोरियन फ्लेवर्सचा भन्नाट तडका. गोचुजांगचा झणझणीतपणा, भाजलेल्या तीळांचा खमंग स्वाद आणि उमामीची खास चव यांचा मिलाफ असलेली ही रेंज प्रत्येक घासाला देणार स्वादाचा एक वेगळाच अनुभव!
कुरकुरीत चिकन, भरपूर सॉस आणि प्रत्येक घासात ओसंडून वाहणारी चव!
केएफसीची खास क्रिस्पी क्रंच आणि चविष्ट, मसालेदार सॉस यांची ही भन्नाट जोडी प्रत्येक बाईटला बनवणार अधिक स्वादिष्ट आणि मजेदार.
तुमचा केएफसी मधला आवडता पदार्थ कोणताही असो, आता त्याला मिळणार आहे कोरियन फ्लेवर्सचा नवा अवतार! क्लासिक झिंजर बर्गरपासून बोनलेस चिकन स्ट्रिप्स, ज्युसी विंग्स आणि हॉट अँड क्रिस्पी चिकनपर्यंत, केएफसीच्या लोकप्रिय पदार्थांना मिळणार आहे कोरियन चवीचा सॉसी ट्विस्ट!
फक्त ₹89 पासून सुरू होणारी ही नवी कोरियन डंक्ड रेंज 10 नोव्हेंबर 2026 पासून भारतातील 1,400 हून अधिक केएफसी रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांना या रेंजचा आस्वाद रेस्टॉरंटमध्ये, टेकअवेच्या माध्यमातून तसेच केएफसी ॲप, वेबसाइट आणि आघाडीच्या फूड डिलिव्हरी ॲप्सवरूनही घेता येईल.
मग वाट कसली पाहताय? केएफसी च्या नव्या कोरियन डंक्ड रेंजसोबत व्हा एकदम सॉसी आणि घ्या चवीचा भन्नाट अनुभव!

Comments
Post a Comment