विठू माऊली" च्या वारीत अनेक अनुभूतीचे उदाहरण
'विठू माऊली' च्या वारीत अनेक अनुभूतीचे उदाहरण
'विठू माऊली " या ग्रुप मार्फत याही वर्षी वारीचे आयोजन केले होते. खरंतर मुंबई ठाणे डोंबिवली कल्याण इथले सगळे फेसबुक व्हाट्सअप ग्रुप मार्फत ओळख झालेले मित्रमंडळी त्यातील कुणाच्यातरी एकाच्या मनात आलं आणि त्याने विचारलं की आपण वारीला का जात नाही आपण जायचं का वारीला असा प्रश्न उपस्तित केला लगेच अनेकांनी होकार दर्शवला आणि तिथून सुरू झाली विठू माऊली ग्रुप ची वारी.
आम्हांला सांगायला आनंद वाटतो की आमचे वारीतले फोटो व्हिडिओ काही मंडळींनी केलेले रिल्स हे पाहून अनेक मित्रमंडळींनी आम्हाला वारीला यायचे म्हणून विनंती केली होती. यावर्षी चक्क दुबईतून त्यांच्या कामासाठी इकडे येणाऱ्या एका जोडप्याने दोन दिवस अधिकची सुट्टी घेऊन वारीत सहभागी झाले होते. एक मैत्रीण ही तर चक्क वापी वरून खास वारी साठी आली होती.
दरवर्षी वारीमध्ये माऊली कुठल्या ना कुठल्या रूपात भेटल्याचा अनुभव येतो यावर्षी आमच्या सोबत मीरा-भाईंदर वरून आलेले आमचे एक मित्र यांचा सुंदर असा कॅमेरा पेट्रोल पंप वरती विसरला होता कशीबशी आमची गाडी सासवड शहरातून वारीच्या मार्गावर पोलिसांना विनंती करून आत सोडली गेली आणि त्यांना तेव्हा आठवलं की माझी कॅमेरा ची बॅग मी विसरलो त्यात त्यांचे महत्त्वाचे डॉक्युमेंट काही पैसे असं सगळं होतं आम्ही लगेच गाडी बाजूला थंबवून आता कसे माघारी जाणार गेलो तर पुन्हा गाडी कशी आत सोडली जाणार याचं चिंतेत असतांना क्षणातच एका पोलिस समोर दिसलें त्यांना हकीकत सांगताचं त्यांनी एक मोटर सायकल वाला थांबवून विनंती करून आमच्या मित्राला तिथपर्यंत सोडण्यास सांगितले त्या बिचाराचा त्या वाटेवरचा पहिलाच प्रवास होता. त्या भागाबद्दल त्याला काहीच माहित नव्हते अनोळखी प्रदेश असतानाही त्या मोटरसायकल वाल्याने एका रिक्षावाल्याला विनंती करून त्या पेट्रोल पंपापर्यंत नेण्यास सांगितलं साधारण आमच्यापासून एक नऊ दहा किलोमीटरच अंतर होतं आणि तितकंच त्याला परत यायचं होतं परंतु रिक्षावाल्याने कसलीच अडचण न सांगता त्यांना त्या पंपावर घेऊन गेले पंपावर उतरताच तिथे पेट्रोल डिस्चार्ज करण्यासाठी असलेल्या एका महिलेने चटकन ओळखून तुमची बॅग विसरले माऊली ती देते असं म्हणून न सांगता ती बॅग त्यांना मिळाले लाखोंची गर्दी असू नये ते सुखरूप आम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले.
यावर्षी सासवड ते जेजुरी असा मागील वर्षाचाच टप्पा निवडण्यात आला होता.सासवडला यमाई मंदिर येथे दुपारचा विसावा असताना पालखी पुढे निघाली आणि चालता चालता माऊलीच्या पादुकांचे प्रसन्न दर्शन झालं.दरवर्षी आम्ही वारी मार्गातील एक टप्पा निवडून विशेषता रविवारचा दिवस ठरवून वारीचे आयोजन करत असतो यासाठी बस बुकिंग सोबत खाण्यापिण्याचे पदार्थ वारकऱ्यांसाठी अन्नदान म्हणून काहीतरी वाटण्याचे पदार्थ तसेच काही औषध याची जुळवाजुळव मंडळातील तानिया परब आणि वैशाली कांबळे या प्रचंड मेहनत घेऊन पार पाडत असतात.
या वर्षीच अनेकांनी सांगितलं मी तुमच्यासोबत वारीस येणार आहोत, तेव्हा पुढच्या वर्षी किमान शंभरेक लोकांची तरी वारीला येण्याची, त्याचा अनुभव घेण्याची, त्यांना सेवा देण्याची आम्हाला संधी मिळेल अशी आशा आहे.राम कृष्ण हरी जाय जाय पंढरी होय होय रे वारकरी खूप छान अनुभव असतो.
अतिशय शिस्तबद्ध वारकरी त्यांच्या दिंड्या राहण्याच्या, खाण्याच्या, सामानाच्या गाड्या खूप शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रम करत असतात. वाटेत थकवा दूर होण्यासाठी वेगवेगळे खेळले जातात. फुगड्या असतील किंवा किंवा फेर धरून म्हटलेली गाणी त्याच्यावरचा सुंदर सण नृत्य असो हे सगळं पाहण्यास खूप आनंद वाटतो.
तुम्हीही एकदा वारीला नक्की भेट द्या मानाच्या आणि विड्यान पिढ्या चालणाऱ्या दिंड्यांसोबत गेल्या काही वर्षापासून मुंबई पुणे इथून आयटी असतील किंवा वेगवेगळ्या ऑफिसमधील बँकेतील कर्मचारी असतील यांचा एक गट एक दिवसाच्या वारीसाठी का होईना नक्कीच पाहायला मिळतो त्यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद खरंच खूप मोठा असतो नक्कीच एकदा आयुष्यात भारी करावी असंच आम्ही आमच्या विठू माऊली ग्रुप तर्फे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो.
Comments
Post a Comment