नवी मुंबईतील अपोलो कर्करोग केंद्रातर्फे विशेष महिला कर्करोग प्रतिबंधक क्लिनिकचे अनावरण
नवी मुंबईतील अपोलो कर्करोग केंद्रातर्फे विशेष महिला कर्करोग प्रतिबंधक क्लिनिकचे अनावरण
भारतात दरवर्षी १ लाख महिलांमध्ये ३५ महिलांना कर्करोगाची लागणनवी मुंबई, २१ ऑगस्ट २०२३: नवी मुंबईच्या अपोलो कर्करोग केंद्राने आज विशेष अपोलो महिला कर्करोग प्रतिबंधक क्लिनिकचे उद्घाटन केले. हे विशेष केंद्र महिलांनाच होणाऱ्या कर्करोगाचे लवकर निदान आणि प्रतिबंध करण्यासाठी कटिबद्ध असेल. अत्याधुनिक केंद्र भारतातील स्त्रियांमध्ये कर्करोगाच्या वाढत्या घटना, विशेषतः स्तन, अंडाशय, गर्भाशय ग्रीवा आणि गर्भाशयाच्या अस्तराच्या कर्करोगाचा सामना करण्यासाठी सहाय्य करेल. नवी मुंबईतील अपोलो कर्करोग केंद्राच्या स्तन शस्त्रक्रियेच्या मुख्य सल्लागार डॉ.नीता एस. नायर यांच्या मतानुसार,“कर्करोगाचे लवकर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्याचे अनेक फायदे देखील आहेत, यामुळे रोगनिदान आणि जीवनाच्या गुणवत्तेवर लक्षणीयरित्या परिणाम होऊ शकतो. रोगाच्या शेवटच्या टप्प्यात निदान होत असल्यामुळे व कर्करोग निर्देशित उपचार सुरु करण्यास उशीर होत असल्यामुळे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कर्करोग असलेल्या रूग्णांचा विशेषत: स्तनाचा कर्करोग असलेल्या स्त्रियांचा जगण्याचा दर कमी झाला आहे. आज भारतातील स्तनाचा कर्करोग असलेले सुमारे ४०% रुग्ण रोगाच्या प्रगत अवस्थेत डॉक्टरांकडे येतात. म्हणून आम्ही ४०-७४ वर्षे वयोगटातील महिलांना नियमित मॅमोग्राफीची तपासणी करण्यासाठी प्रोत्साहन देतो, अपोलो महिला कर्करोग प्रतिबंधक क्लिनिक कर्करोगाच्या तपासणीपासून ते व्यवस्थापनापर्यंतच्या अशा सेवांची एकात्मिक श्रेणी सादर करुन परिस्थिती बदलण्यास मदत करेल.”
डिसेंबर २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘आयसीएमआर’ च्या अहवालानुसार भारतात कर्करोगाचे निदान झालेल्या पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक आहे. अहवालात अशीही सूचना देण्यात आली आहे की भारतात दरवर्षी १लाख महिलांमध्ये ३५ महिलांना कर्करोग होतो. स्तनाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. शहरी भारतातील २२ पैकी १ महिलेमध्ये आयुष्यात स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. भारतातील ४०% स्त्रियांच्या कर्करोगाची प्रकरणे ही अजूनही प्रगत अवस्थेत आहेत. गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या आहे, ज्यामध्ये दरवर्षी ९६,९२२ नवीन प्रकरणे येतात आणि ६०,०७८ रुग्णांचा मृत्यू होतो. २५-४४ वर्षे वयोगटातील भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर गर्भाशयाच्या ग्रीवाचा कर्करोग हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (एफओजीएसआय) ने नमूद केले आहे की गर्भाशयाच्या ग्रीवाच्या तपासणी कार्यक्रमाच्या अभावामुळे भारतात या आजाराचे भार जास्त वाढले आहे. ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये एकदाच स्क्रीनिंग केल्यामुळे गर्भाशयाच्या ग्रीवाच्या कर्करोगाचा धोका २५% कमी झाला आहे.
Comments
Post a Comment