भारताच्या भाडे बाजारपेठेची घोडदौड कायम..
भारताच्या भाडे बाजारपेठेची घोडदौड कायम; तिमाही ते तिमाही सरासरीत जवळपास 4.9% ची वाढ: मॅजिकब्रिक्स
- भाडेपट्टी मागणी तिमाही ते तिमाही 18.1% ने वाढली; भाडे पुरवठा तिमाही ते तिमाही 9.6% नी वधारली
- एनसीआर (27.25%), एमएमआर (18.35%), पुणे (19.3%), हैदराबाद (22%) आणि बेंगळुरू (12.8%) भाडे मागणीत सर्वोच्च वाढ झाल्याचे स्पष्ट
- 1 आणि 2 बीएचके घरांच्या मागणीकरिता एकूण रेंटल सर्च 80%; आटोपशीर तसेच छोट्या अपार्टमेंटना प्राधान्य असल्याचा इशारा
मुंबई, 22 ऑगस्ट, 2023 –
मॅजिकब्रिक्स हा भारताचा अग्रगण्य रिअल इस्टेट मंच असून त्यांनी एप्रिल-जून 2023 दरम्यान प्रमुख रेंटल इंडेक्स प्रसिद्ध केला, त्यानुसार भारताच्या 13 मुख्य शहरांतून तिमाही ते तिमाही भाडे मागणी 18.1% वाढली असल्याचे निदर्शनास आले, पुरवठा तिमाही ते तिमाही 9.6% वाढला तर भाड्यात साल-दरसाल 4.9% नी वृद्धी नोंदविण्यात आली.
मॅजिकब्रिक्स मंचावर सुमारे 2 कोटी ग्राहकांचे वर्तन आणि प्राधान्य आधारावर या अहवालात निदर्शनास आले की बेंगळुरू (8.1%), नवी मुंबई (7.3%), आणि गुरूग्राम (5.1%) मध्ये तिमाही ते तिमाही सरासरी भाड्यात सर्वोच्च वृद्धी झाल्याचे समजते. याउलट, दिल्ली (-0.9%) आणि मुंबई (-0.1%) तील तिमाही ते तिमाही भाडेपट्ट्यात किरकोळ घसरण दिसली.
मॅजिकब्रिक्स’चे सीईओ सुधीर पै म्हणाले, “गेल्या वर्षभरात, मोठमोठ्या भारतीय शहरांमध्ये रेंटल हाऊसिंगची मागणी वाढली आहे, शहरांत परतून येणारे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमुळे ही मागणी अवलंबून असते. लोकांचा कल कार्यालयीन संस्कृतीकडे पुन्हा सुरू झाला असून कार्यालयीन ठिकाणाहून जवळ असलेल्या घरांची गरज वाढली आहे, शिवाय शैक्षणिक संस्थांनी वैयक्तिक क्रियाकलाप पुन्हा सुरू केले आहेत. त्यामुळे विद्यार्थीवर्ग शहराच्या केंद्रांकडे खेचला जातो आहे. दरम्यान, मालमत्तेचे मूल्य वाढत असताना, घरमालकांनी भाड्याच्या तुलनेत फायदेशीर मालमत्तेच्या विक्रीच्या संधी मिळवल्या. पुरवठा कमी केला. यामुळे, मोठ्या मागणीसह, भारताच्या प्रमुख शहरांत भाडे वाढले.."
मॅजिकब्रिक्स अहवालानुसार, 2 बीएचके घरांची लोकप्रियता आव्हानात्मक राहिली आहे, मागणी आणि पुरवठा या दोन्हीमध्ये लक्षणीय 53% वाटा आहे, त्यानंतर 1 बीएचके (27%) आणि 3 बीएचके (18%) येतात. 3 बीएचके घरांची मागणी पहिल्या तिमाहीत 2023 मध्ये 36% वरून 2023 मध्ये दुसऱ्या तिमाहीत 18% पर्यंत घसरली, तर 1 बीएचके घरांची मागणी 2023 मधील पहिल्या तिमाहीत 17% वरून सध्याच्या तिमाहीत 27% पर्यंत वाढली. हे परिवर्तन आटोपशीर अपार्टमेंट्सकडे वाढता कल अधोरेखित करते.
रोजगार केंद्रांच्या समीपतेच्या पलीकडे, या तिमाहीत मागणीसाठी एक महत्त्वपूर्ण प्रेरक शक्ती परवडणारी क्षमता आहे. भाडेकरूंमध्ये रू.10,000 ते 20,000 च्या दरम्यान मासिक भाडेपट्टीवर उपलब्ध निवासस्थानांना पसंती देण्यात येते. हा प्रधान्यक्रम प्रामुख्याने 500 ते 1,000 चौरस फूट व्यापलेल्या क्षेत्रफळाच्या दिशेने आढळून आला.
Comments
Post a Comment