सन मराठी’च्या ‘सावली होईन सुखाची’ मधील ‘बिट्टी’ उर्फ आरंभी उबाळेला सर्वजण म्हणतात ‘वन टेक आर्टिस्ट

 सन मराठी’च्या ‘सावली होईन सुखाची’ मधील ‘बिट्टी’ उर्फ आरंभी उबाळेला सर्वजण म्हणतात ‘वन टेक आर्टिस्ट

एकाच टेकमध्ये परफेक्ट शॉट देणारी बालकलाकार आरंभी उबाळे उर्फ ‘सन मराठी’च्या ‘सावली होईन सुखाची’ मधील ‘बिट्टी
घारे डोळे, निरागस अभिनय, गोड हास्य... अशी आहे आपली ‘वन टेक आर्टिस्ट’ आरंभी उबाळे उर्फ ‘सन मराठी’च्या ‘सावली होईन सुखाची’ मधील ‘बिट्टी
‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील 'सावली होईन सुखाची' या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केलेली आहे. ‘सोहळा नात्यांचा’ असं ब्रीदवाक्य असलेल्या या मराठी वाहिनीला प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला आवडतंय हे अचूक कळलेलं आहे, म्हणूनच 'सावली होईन सुखाची' ही नवी मालिका प्रेक्षक सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता न चुकता पाहतात आणि सोशल मिडीयाच्या मदतीने त्यांच्या भावना देखील पोहचवतात.
सध्या प्रमुख कलाकारांपेक्षा बाल कलाकार हे जास्त चर्चेचा विषय बनले आहेत. मनोरंजन सृष्टीत मोठ्या कलाकारां इतकाच जास्त भाव बालकलाकारांना मिळतोय. अर्थात, त्यांच्यामध्ये असणा-या कलेची दाद दिलीच पाहिजे. वयाने लहान असूनही कॅमे-यासमोर बिनधास्तपणे वावरण्याची त्यांना अजिबात भीती वाटत नाही, त्यांच्या प्रत्येक कामात आत्मविश्वास जास्त दिसून येतो, दिग्गज कलाकारांच्या सोबतीने काम करणं असो किंवा सीन्सचे पाठांतर, सीन्सनुसार लागणारे हावभाव सगळं काही अगदी अचूक असतं. बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे आणि त्यातील एक नाव म्हणजे आरंभी उबाळे. घारे डोळे, गोंडस चेहरा, निरागस हास्य आणि अभिनयाच्या बाबतीत तर कमाल मुलगी अशी आरंभीची ओळख होते.
‘सन मराठी’वरील ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत बालकलाकार आरंभी उबाळे ही ‘बिट्टी’ची भूमिका साकारत आहे. १४ ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या मालिकेतील आरंभीने साकारलेली ‘बिट्टी’ची भूमिका सर्वांनी पाहिलीच असेल. आरंभीचा गोडवा हा बिट्टीमध्ये उतरला आहे, म्हणजे बिट्टी हे पात्रं प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा तयार करणार यात शंका नाही.
आरंभीला तिच्या वयाच्या अडीच वर्षापासून कॅमेरासमोर कसं वावरायचं या विषयी योग्य असे मार्गदर्शन तिच्या आईकडून मिळाले आणि त्याचा फायदा तिला पुढे झाला. आरंभीने जाहिरातीत काम केले आहे. ‘गुम है किसीं के प्यार में’ आणि ‘अनुपमा’ या दोन हिंदी मालिकेत आणि ‘क्षण’ या मराठी शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय केला आहे. मराठीमध्ये काम करण्याची तिची इच्छा ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली. आरंभीचे कौतुक झालेच पाहिजे हे म्हणण्यामागे कारण की, आरंभी ही ‘वन टेक आर्टिस्ट’ आहे. ‘एकाच टेकमध्ये परफेक्ट शॉट देणारी बालकलाकार’ असे सेटवर अनेकांचे मत आहे. दिवसभर सेटवर असणारी आरंभी अभ्यास देखील मनापासून करते. अभिनय आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींमधला समतोल आरंभी आणि तिच्या आई-वडीलांनी सांभाळला आहे. मुळात, घरातील शिस्तप्रिय वातावरण असल्यामुळे आरंभीमध्ये समजूतदारपणा, मेहनत करण्याची तयारी, मोठ्यांप्रती, कामांप्रती आदर करण्याचा स्वभाव हा आपसूक आला आहे.
‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत आरंभी, प्रमुख कलाकार रोनक शिंदे आणि सीमा कुलकर्णी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करत आहे. या मालिकेत आईची संघर्षमय गोष्ट दाखवण्यात आली आहे जी आपल्या मुलीला घेऊन एका मोठ्या श्रीमंत घरात राहतेय पण ती मालकीण नसून, घरातील मोलकरीण आहे. आरंभी आणि सीमा कुलकर्णी यांनी माय-लेकीची भूमिका साकारली आहे. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय काय घडतं आणि त्या दोघी प्रत्येक परिस्थितीला कशा सामो-या जातात हे पाहण्यासाठी नक्की पाहा  'सावली होईन सुखाची' सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..