नवी मुंबईत गंभीर रुग्णांसाठी प्रगत 'रिहँबिलिटेशन' सेवा सुरु
नवी मुंबईत गंभीर रुग्णांसाठी प्रगत 'रिहँबिलिटेशन' सेवा सुरु
नवी मुंबई, २४ ऑगस्ट २०२३: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स (एएचएनएम) ने आज न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि गंभीर आजारांसाठी प्रगत रिहॅबिलिटेशन सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यावेळेस अपोलो हॉस्पिटल्सचे न्यूरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. शेखर पाटील, न्यूरोसर्जरीचे सल्लागार डॉ.अभिधा शाह, न्यूरोसर्जरीचे सल्लागार डॉ. सुनील कुट्टी, फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशनचे प्रमुख सल्लागार डॉ. नितीन मेनन, अपोलो हॉस्पिटलचे पश्चिम क्षेत्राचे प्रादेशिक-सीईओ संतोष मराठे उपस्थित होते. प्रगत रिहॅबिलिटेशन सेवांमध्ये प्रभावीपणे चालण्याच्या प्रशिक्षणासाठी रोबोट-सहाय्यक थेरपीसाठी लोकोमॅट, हालचालीसाठी एरिगो, आणि हायड्रोथेरपी, यासह नवीनतम प्रगत उपकरणांचा समावेश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा नवीन संच न्यूरोलॉजिकल आजार, विनाशकारी जखम, जटिल शस्त्रक्रिया आणि अपक्षयी स्थितीने ग्रस्त असलेल्या रुग्णांना लवकर बरे करण्याची एक नवी आशा देईल.
स्ट्रोक, आघातजन्य दुखापती यासारख्या स्थितींमध्ये किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस सारख्या मेंदूवर परिणाम करणाऱ्या आजारांमध्ये, रुग्णांना चालणे, खाणे, लिहिणे इ. आणि बोलणे किंवा गिळणे या क्रिया करता येत नाहीत व त्यांचे हातपाय अखडतात. केवळ औषधोपचाराने पहिल्यासारखी गतिशीलता येऊ शकत नाही तसेच यासाठी मेंदूला पुन्हा प्रशिक्षण देणे आवश्यक असते. या प्रकरणांमध्ये, न्यूरोरिहॅबिलिटेशनसाठी प्रगत रोबोटिक उपकरण असलेले लोकोमॅट रुग्णांना सुरक्षित वातावरणात, त्रासदायक प्रयत्नांशिवाय सामान्यपणे चालण्याचा सराव करण्यास आणि चालण्याच्या आणखी सामान्य पद्धती पुन्हा प्राप्त करण्यास सक्षम करेल.
डॉ. नितीन मेनन, फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन - प्रमुख सल्लागार, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले की, “हे नवीन तंत्रज्ञान रूग्णाला उत्तम सेवा देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. यामुळे केवळ आमची क्षमताच वाढत नाही तर रिहॅबिलिटेशनसाठी एक नवीन आयाम प्राप्त होतात, लोकोमॅट रुग्णाला त्रासदायक प्रयत्नांशिवाय किंवा पडण्याच्या भीतीशिवाय अधिक सामान्यपणे चालण्याची पद्धत पुन्हा प्राप्त करण्यास सक्षम करते. एरिगो थेरपी अंथरुणावर खिळून राहिलेल्या किंवा गतिशीलतेसाठी व्हीलचेअरची गरज असलेल्या रुग्णांना त्यांच्या खालच्या बाजूच्या स्नायूंची ताकद वाढवण्यास आणि दैनंदिन जीवनातील क्रियाकलापांसाठी अधिक कार्यात्मक स्वातंत्र्य प्राप्त करते आणि अपंगत्व टाळले जाते”
संतोष मराठे, पश्चिम क्षेत्राचे प्रादेशिक-सीईओ, अपोलो हॉस्पिटल म्हणाले,“अपोलो कडे कार्डिओलॉजी, प्रत्यारोपण, ऑन्कोलॉजी आणि न्यूरो-ऑर्थो सेवांचा समावेश असलेला एक अतिशय विस्तृत बहु-कुशल असा वैद्यकीय सेवा प्रोग्राम आहे. आमच्या सध्याच्या रिहॅबिलिटेशन आणि फिजिओ सेवांद्वारे स्नायूंना बळकट करताना रुग्णांच्या हालचाल करण्यास आणि सहनशक्ती वाढवण्यास मदत होते. रोबोटिक तंत्रज्ञान, गैट रिहॅब (पुन्हा पहिल्यासारखे चालणे) आणि हायड्रोथेरपी व्यतिरिक्त, रिहॅब युनिटमध्ये कार्डिओपल्मोनरी, मस्कुलोस्केलेटल, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच आणि लँग्वेज थेरपिस्ट आणि बालरोग सेवांमध्ये तज्ञ असलेली उच्च पात्र आणि अनुभवी वैद्यकीय टीम आहे.”
Comments
Post a Comment