'सुभेदार’ चित्रपटाची जोरदार घोडदौड

 'सुभेदार’ चित्रपटाची जोरदार घोडदौड

 पहिल्याच वीकेंडला ५ कोटींहून अधिकची विक्रमी कमाई

हिंदवी स्वराज्यातील सुवर्णपान उलगडत  सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम  सादर करणाऱ्या 'सुभेदार' चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर गारूड केलं आहे.  लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील 'सुभेदार' रूपी पाचवे चित्रपुष्प २५ ऑगस्टला रसिक दरबारी सादर केले आणि ३५० चित्रपटगृहांतील १००० हून अधिक शोजमधून प्रेक्षकांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळातायेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही 'सुभेदार' चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरु आहे. पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने ५ करोडहून अधिकची विक्रमी कमाई केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही 'सुभेदार' चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहील, असा अंदाज वर्तवला जातोय.   

चित्रपटातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. 'आले मराठेया गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन भगवे झेंडे घेऊन नाचत आहेत. मुखानं 'जय भवानीजय शिवाजी'चा जयघोष करत प्रेक्षकांचे लहान-मोठे गट एकत्रितपणे सिनेमा पहायला गर्दी करत आहेत.

सुभेदार सिनेमाने बॉक्स ऑफिसचा गड दणक्यात सर केला आहे. 

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या सुभेदार चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन्समुळाक्षर प्रोडक्शन्स प्रा.लिपृथ्वीराज प्रोडक्शनराजाऊ प्रोडक्शनपरंपरा प्रोडक्शन्स यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकरअनिल वरखडे,  दिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकरश्रमिक गोजमगुंडेविनोद जावळकरशिवभक्त अनिकेत जावळकरश्रुती दौंड हे सुभेदार चित्रपटाचे निर्माते आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..