नात्यातील लळा दर्शवणार ‘चाहूल’

नात्यातील लळा दर्शवणार ‘चाहूल’

‘डायरी ॲाफ विनायक पंडित’मधील पहिले गाणे प्रदर्शित 

एका कलाकाराची जीवनगाथा सांगणाऱ्या ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ या वेबफिल्ममधील ‘चाहूल’ हे सुरेल गाणे प्रदर्शित झाले असून नव्या नात्याचे पाऊल टाकणाऱ्या या गाण्याला अभय जोधपूरकर यांचा हृदयस्पर्शी आवाज लाभला आहे. तर निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मयूर करंबळीकर यांचे बोल लाभले आहेत. हळुवार फुलत जाणाऱ्या नवीन नात्याचं खूप सुंदर वर्णन या गाण्यातून केलं आहे. 

चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॅम प्रोडक्शन सहनिर्मित या वेबफिल्मचे दिग्दर्शन मयूर शाम करंबळीकर यांनी केले असून अक्षय विलास बर्दापूरकर ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’चे सादरकर्ते आहेत. तर आदित्य विकासराव देशमुख, वेदांत विवेक मुगळीकर हे निर्माते आहेत. 

गाण्याबद्दल दिग्दर्शक मयूर शाम करंबळीकर म्हणतात, ‘’ हे गाणे थेट मनाला भिडणारे आहे. अतिशय अर्थपूर्ण असे हे गाणे नवीन नात्यातील बंध दर्शवत आहे. हे तरल गीत संगीत प्रेमींना नक्कीच आवडेल.’’

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..