तुम्ही आहात का भावी इंडियन आयडॉल ?

तुम्ही आहात का भावी इंडियन आयडॉल ? 

भावी सिंगिंग सुपरस्टारचा शोध झालायं सुरू, ऑडिशनसाठी 27 ऑगस्टला मुंबईतील नाहर इंटरनॅशनल स्कूलमध्ये या

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सर्वांचा आवडता गायन रिॲलिटी शो इंडियन आयडॉल पुन्हा एका नव्या हंगामासह परतला आहे. आपल्या आगामी आवृत्तीत सादर करता अशा झकास गुणवंतांचा शोध सध्या सुरू आहे. उभरत्या गायकांना त्यांची कला सादर करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देत मालिकेचे निर्माते आता स्वप्नांचे शहर – मुंबईत आगामी सिंगिंग सुपरस्टारच्या शोधात निघाले आहेत.

जर तुमच्यातही गीत-संगीताविषयी असीम प्रेम अन् जिद्द असेल तर आणि तुमचे गायन कौशल्य दाखवण्यासाठी तुम्ही संधीच्या शोधात असाल तर 27 ऑगस्ट 2023 ला ऑडिशन द्यायला या. पत्ता आहे - नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर्स अमृतशक्ती, चांदिवली फार्म रोड, ऑफ साकीनाका रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400072.

यंदाच्या सीझनमध्ये इंडियन आयडॉल तुम्हाला एका अद्भूत प्रवासावर नेणार आहे. जेथे देशातील सर्वोत्तम गुणवंत गायक अनुभवायला मिळतील. आशावादी स्पर्धकांना त्यांची स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी या संधीचा पुरेपूर लाभ उठवण्यासाठी प्रेरित केले जाईल. इतकेच नव्हे तर देशाचे भावी लाडका गायक बनण्याचीही संधी त्यांना मिळेल.

अधिक माहितीसाठी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचे अधिकृत सोशल मीडिया चॅनेल @sonytvofficial ला भेट द्या.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..