सीबीडीटीकडून प्राप्तिकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in या नव्या रूपातील राष्ट्रीय वेबसाईटचा प्रारंभ

सीबीडीटीकडून प्राप्तिकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in  या नव्या रुपातील राष्ट्रीय वेबसाईटचा प्रारंभ

मोबाईल फोनवर वापरण्यास सोयीची होईल अशा प्रकारे नव्या वेबसाईटची आकर्षक रचना - आशयासाठी मेगा मेनू, अनेक नवी वैशिष्ट्ये आणि कार्यप्रक्रियांचा समावेश

सर्व प्रकारच्या नव्या सुविधांसाठी गायडेड व्हर्चुअल टूर आणि नवीन बटण इंडिकेटर्स

नव्या रूपातील वेबसाईटवर वापरकर्त्यांना विविध कायदे, कलमे, नियम आणि करविषयक करार यांची तुलना करण्याची सोय

मुंबई,26 ऑगस्ट 2023ः  करदात्यांना अधिक सुविधा पुरवण्यासाठी आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वेगासोबत ताळमेळ राखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने www.incometaxindia.gov.in  या आपल्या राष्ट्रीय वेबसाईटला नव्या रुपात उपलब्ध केले आहेज्यामध्ये वापरकर्त्यांना सोयीचे इंटरफेसमूल्यवर्धित वैशिष्ट्ये आणि नव्या मॉड्युल्सचा समावेश आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष नीतीन गुप्ता यांच्या हस्ते उदयपूर येथे प्राप्तिकर महासंचालनालयाच्या चिंतन शिबिरात या नव्या वेबसाईटचे उद्घाटन झाले. कर आणि इतर संबंधित माहितीचे एक सर्वसमावेशक भांडार म्हणून ही वेबसाईट काम करेल. थेट करविषयक कायदेइतर अनेक संबंधित कायदेनियमप्राप्तिकर परिपत्रके आणि अधिसूचनासर्व क्रॉस रेफरन्स आणि हायपरलिंक यांची माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे.  प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी करदात्यांना सोयीची होतील अशी अनेक टॅक्स टूल्स असलेले एक टॅक्सपेयर सर्विस मॉड्युल उपलब्ध करून देण्यात आले आहे. मोबाईल फोनवर वापरण्यास सोयीची होईलअशा प्रकारे नव्या वेबसाईटची आकर्षक रचना करण्यात आली आहे. या वेबसाईटवर आशयासाठी मेगा मेनूअनेक नवी वैशिष्ट्ये आणि फंक्शन्सचा समावेश आहे. या वेबसाईटला भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या सोयीसाठी या वेबसाईटवर नव्याने भर घालण्यात आलेल्या वैशिष्ट्यांची माहितीएका गायडेड व्हर्चुअल टूरच्या मदतीने आणि नव्या बटण इंडिकेटर्सद्वारे देण्यात येते. नव्या कार्यप्रक्रियांमुळे वापरकर्त्यांना विविध कायदेकलमेनियम आणि करविषयक करार यांची तुलना करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या साईटवर सुलभ हाताळणीसाठी सर्व संदर्भित आशय आता प्राप्तिकर विभागाच्या सेक्शनसह टॅग केला जातो. त्याशिवाय डायनॅमिक ड्यू डेट अलर्टच्या (विवरणपत्र दाखल करण्याच्या तारखेची आठवण करून देणारा इशारा) कार्यप्रक्रियेमुळे रिव्हर्स काऊंटडाऊनटूलटिप्स आणि संबंधित पोर्टल्सच्या लिंक करदात्यांना सहजपणे अनुपालन करण्यासाठी उपलब्ध होतात.  करदात्यांना अधिक जास्त सुविधा देण्यासाठी ही नव्या रुपातील वेबसाईट आणखी एक उपक्रम असून करदात्यांना प्रशिक्षित करणे आणि कर अनुपालनाच्या सुविधा देणे सुरूच ठेवले जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..