नवोन्मेषाचा आनंद घेऊन रंगला 'चिरायू’
नवोन्मेषाचा आनंद घेऊन रंगला 'चिरायू’
'चैत्र शुद्ध प्रतिपदा' म्हणजेच ‘गुढीपाडवा’ उत्साहाने आणि उमेदीने साजरे करण्याची आपली परंपरा आहे. मराठी मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही. नवनवे संकल्प आणि कार्य-प्रकल्पांसोबत मनोरजंनाची गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत ‘चिरायू’तर्फे दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दणक्यात साजरं केलं जातं. यंदाही गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी ‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. 'चिरायू २०२४' साठी अवघं मराठी कलाविश्व एकवटलं होतं.
‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने आयोजित ‘चिरायू २०२४’ चे वैशिष्ट्य म्हणजे नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल ‘चिरायू’ च्या मंचावर आवर्जून घेतली गेली. कलेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सतीश लिंगाप्पा खवतोडे (कपडेपट), देविदास दरवेशी (नेपथ्य), डॉ. खुशाले (रुग्णसेवा), रेखा सावंत (केशभूषा) यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यंदाच्या या सोहळ्यात रील स्टार्स रोहित मावळे (फूड व्लागर), आरजे प्रणित (स्टंड अप कामेडी), रोहन पाटकर (वाईल्ड लाईफ फोटोग्राफी), वैष्णवी नाईक (फॅशन एंड लाईफस्टाईल) सुमन धामणे आजी (खाद्यपदार्थ/ फूड) यांचाही गौरव करण्यात आला. ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या सायली, रुद्र, हंसिका या लहानग्यांनी सुरेख गुढ्यांची निर्मिती केल्याबद्दल त्यांचं खास कौतुक ‘चिरायू’ च्या मंचावर करण्यात आलं.
याप्रसंगी बोलताना‘चिरायू’चे सुशांत शेलार यांनी सांगितले की, ‘नव्या उमेदीने आम्ही नववर्षाची सुरुवात करीत असून मनोरंजनाच्या माध्यमातून कलेचा वसा समृद्धपणे जपण्याचा तसेच मराठी सृष्टीला नाविन्याचा आयाम देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. वीणा ग्रुप, मुंबई बीट्स, नील ग्रुप, समर्थ व्हिजन हे यंदाच्या 'चिरायू २०२४' चे प्रायोजक होते.
Comments
Post a Comment