टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 मध्ये सामाजिक कारणांसाठी 72.39 कोटी रुपये जमा

- एनजीओ, कॉर्पोरेट्स आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद; सर्वात मोठ्या स्पोर्टिंग प्लॅटफॉर्मवर फिलँथ्रॉपी निधी उभारणीसाठी मैलाचा दगड ठरण्यासाठी प्रयत्नशील

मुंबई, 5 एप्रिल 2024: आशियातील सर्वात प्रतिष्ठित टाटा मुंबई मॅरेथॉनच्या (टीएमएम) माध्यमातून सामाजिक कारणासाठी उभारण्यात येणारा निधी हे मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तब्बल 268 एनजीओच्या पाठिंब्याने टीएमएमने पुन्हा एकदा विक्रम मागे टाकताना सामाजिक कारणांसाठी 72.39 कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. परोपकार आणि सामुदायिक सहभागामध्ये ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. टीएमएमने व्यक्ती आणि संस्थांना सारखीच प्रेरणा देताना भविष्यकाळासाठी सामूहिक कृतीची शक्ती प्रदर्शित करत आहे - करीऊळश्रर्चीालरळ.

टाटा मुंबई मॅरेथॉनने युनायटेड वे मुंबईच्या नेतृत्वाखाली परोपकारासाठी (फिलँथ्रॉपी) भारतातील सर्वात मोठे क्रीडा मंच आणि सामाजिक क्षेत्रासाठी आशेचा किरण म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. या वर्षीची कामगिरी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सहभागी आणि समर्थकांची अतूट बांधिलकी अधोरेखित करते.

उदारतेच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये, निधी उभारणारे 1157 जण , 179 कॉर्पोरेट्स, 24,083 वैयक्तिक देणगीदार आणि 12,000हून अधिक धावपटूंनी हेल्थकेअर, शिक्षण, पशु कल्याण आणि पर्यावरण, महिला सबलीकरण, उपजीविका आणि सामाजिक आणि सामाजिक विकास या सर्व क्षेत्रांत कार्यरत असलेल्या 268 स्वयंसेवी संस्थांना पाठिंबा देण्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. .

अगदी पहिल्या आवृत्तीपासून टाटा मुंबई मॅरेथॉनने अनेक अडथळे पार करताना आता एकूण 429.60 कोटींहून अधिक रुपयांचा निधी उभारला आहे. त्याचा फायदा 1000हून अधिक एनजीओंना विविध कारणांसाठी फायदा होत आहे.

टाटा सन्सचे ब्रँड आणि मार्केटिंग हेड एड्रियन टेरॉन म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन केवळ धावण्यासाठीच नव्हे तर तिच्या परोपकारी आणि समाज-प्रेरित भावनेसाठीही प्रसिद्ध आहे. या वर्षीच्या कार्यक्रमाने विविध सामाजिक कारणांसाठी योगदान देण्यासाठी अपवादात्मक निधी उभारला आहे, जो समाजात सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेशन एकत्र काम करणार्‍या सामर्थ्याचा पुरावा आहे. या वाढत्या चळवळीचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. समाजाच्या भल्यासाठी योगदान देण्याची टाटा समूहाची वचनबद्धता दर्शवते.

उज्ज्वल माथूर, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कंट्री हेड - इंडिया बिझनेस, टीसीएस, म्हणाले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) समाजाची सेवा करण्याची वचनबद्धता ही आमची ओळख आणि मूल्यांशी निगडित आहे. टाटा मुंबई मॅरेथॉनसोबतची आमची चिरस्थायी भागीदारी सामुदायिक सहभागासाठी उत्प्रेरक म्हणून काम करते. आम्हाला विविध परोपकारी कारणांसाठी (फिलँथ्रॉपी) चॅम्पियन बनवते. मानवी सहनशक्तीचे प्रदर्शन करण्यापलीकडे, मॅरेथॉन मानवतेच्या भावनेला आणि एका चांगल्या जगाच्या सामूहिक प्रयत्नांना मूर्त रूप देते. सामाजिक समस्यांबाबत जागरूकता निर्माण करून अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याच्या आमच्या ध्येयामध्ये आम्ही दृढ आहोत. आमच्या मिशनचा परिणाम सकारात्मक कृतीत झाला आहे.

युनायटेड वे मुंबईचे सीईओ जॉर्ज आयकारा यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 च्या यशाचे कौतुक केले आणि सहभागींनी दाखवलेल्या अपवादात्मक वचनबद्धतेवर आणि विश्वासावर भर दिला.  टाटा मुंबई मॅरेथॉनची ही आवृत्ती आम्ही पाहिलेली सर्वात विलक्षण, विक्रमी आवृत्ती आहे! टीएमएमचे परोपकारी व्यासपीठ हे सर्वात महत्त्वाचे आणि विश्वासार्ह माध्यमांपैकी एक आहे. ज्याची व्याप्ती मोठा आहे. समाजाला काही तरी देणे लागतो अशा कंपन्या, स्वयंसेवी संस्था, निधी उभारणारे आणि व्यक्तींनी आम्हाला निवडले आहे. निधी उभारणार्‍यांपैकी, आमच्याकडे टीएमएम चेंज लीजेंड्ससाठी  पात्र ठरलेल्या 10 व्यक्ती आहेत. ज्यांनी 1 कोटी पेक्षा निधी गोळा केला.  मनीषा खेमलानीने तिच्या मागील विक्रमाला मागे टाकताना 9.94 कोटी रुपयांचा निधी उभारले. टीएमएमच्या इतिहासात कोणत्याही व्यक्तीने उभारलेला आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. डॉ. बिजल मेहता,  दर्शिनी भट आणि श्याम जसानी यांनी प्रत्येकी चार कोटींहून अधिक निधी गोळा केला आहे!

युनायटेड वे मुंबई येथे, टीएमएमच्या परिवर्तनीय प्रभावावर विश्वास ठेवल्याबद्दल प्रत्येक देणगीदाराचा अतूट पाठिंबा, विश्वास आणि उदारता मिळाल्याबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत.  विली डॉक्टर, सुनीत कोठारी, विपुल शाह, राजकुमार जैन, डॉ. मीरा मेहता आणि उत्प्पल मेहता हे या वर्षीचे इतर चेंज लीजंड आहेत.

या आवृत्तीत लक्षणीय प्रतिसाद लाभला आहे; विशेष म्हणजे, सुमारे 10,000 सहभागी कॉर्पोरेट क्षेत्रातील आहेत. कर्मचार्‍यांचा समावेश करण्यासाठी, निधी निर्माण करण्यासाठी आणि सीएसआर योगदानांद्वारे परोपकारासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी, टीएमएमने खपवळर खपल. साठी प्राधान्यकृत कार्यक्रम म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. एकट्या या सेगमेंटने 22 कोटींहून अधिक प्रभावी रकमेचे योगदान दिले आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या सीएसआर प्रमुख रचना अय्यर म्हणाल्या, आमच्या 3 स्तंभांपैकी  (पिलर) एक म्हणून सामाजिक भल्यासाठी एक शक्ती मानणारी संस्था म्हणून, आयडीएफसी फर्स्ट बँक ही मुंबई मॅरेथॉनशी निगडीत आहे, ही आशियातील सर्वात मोठी मान्यताप्राप्त मॅरेथॉन आहे.  समाजाच्या कल्याणासाठी सेवा देणे आणि योगदान देणे हे बँकेचे ध्येय आहे. बँकेच्या सीएसआर विभाग- प्रथम प्रभाव आणि आमच्या ग्राहकांच्या योगदानाद्वारे, आमचे उद्दिष्ट सामाजिक जबाबदारीच्या आमच्या फोकस क्षेत्रांमध्ये, म्हणजे उद्योजकता आणि उपजीविका, शिक्षण आणि स्वच्छता या क्षेत्रांमध्ये व्यापक संधी निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच, सामाजिक प्रभाव पाडण्याबरोबरच तुमची आर्थिक तंदुरुस्ती समृद्ध करण्याचे आमचे ध्येय आहे कारण एकटे, आम्ही थोडेच करू शकतो परंतु एकत्रितपणे आम्ही बरेच काही करू शकतो!

पहिल्या वर्षी, टीएमएम ग्रीन बिब - ग्रो फॉरेस्ट उपक्रमाने 5,116 झाडे लावण्यासाठी 32.48 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी उभारला आहे. 2,612 धावपटूंकडून देणग्या आल्या आहेत. युनायटेड वे मुंबईच्या मार्गदर्शनाखाली हा समुदाय-आधारित वृक्षारोपण आणि उपजीविका समर्थन प्रकल्प हे सुनिश्चित करतो की लावलेले प्रत्येक झाड केवळ मृदा संवर्धन आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी योगदान देत नाही, तर त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍याचे जीवनमान टिकवून ठेवण्यास मदत करते. यावर्षी हा उपक्रम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शाश्वत शेती पद्धतींमध्ये सहभागी होऊन शेतकर्‍यांना मदत करत आहे. या पायलट वर्षाचे यश ही ढचच् द्वारे दीर्घकालीन वचनबद्धतेची सुरुवात आहे जिथे दरवर्षी एक नवीन प्रदेश ओळखला जाईल.

प्रोकॅम इंटरनॅशनलचे जेटी एमडी विवेक सिंग म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन ही खेळ आणि परोपकाराची शक्ती एकत्रितपणे सकारात्मक बदलासाठी उत्प्रेरक ठरत आहे. परोपकाराच्या माध्यमातून आपण अंतर भरून काढू शकतो, समुदायांना सशक्त करू शकतो आणि संधीची बीजे रोवू शकतो. . हे केवळ आकड्यांबद्दल किंवा उभारलेल्या पैशांबद्दल नाही; ते स्पर्श झालेल्या, प्रभावित झालेल्या आणि भविष्यात बदललेल्या जीवनाबद्दल आहे. या स्तंभाला यश मिळवून दिल्याबद्दल युनायटेड वे मुंबईचे आमचे मनापासून आभार आणि या महत्त्वपूर्ण प्रयत्नासाठी आमच्या सर्व निधी उभारणार्‍यांचे अभिनंदन. प्रत्येक मैलाचा दगड करुणा आणि सहानुभूतीच्या या प्रवासात पोहोचलेले, मानवतेच्या महान प्रयत्नांचे सार प्रतिबिंबित करणारे, अधिक उज्वल अधिक समावेशक जगाची घोषणा करते.

- 2024 मॅरेथॉन नंबर्समध्ये

सहभागी एनजीओ - 268

सहभागी कॉर्पोरेट्स  - 179

कॉर्पोरेट संघ - 267

निधी उभारण्यासाठी साइन अप करणार्‍या व्यक्ती - 1650

सक्रिय निधी उभारणारे (ज्यांनी काही पैसे उभे केले आहेत) - 1157

चेंज रनर्स (1.75 लाखांपेक्षा जास्त निधी उभारणारे) - 19

- पुरस्कार प्राप्तकर्ते - प्रेरणादायी बदल आणि जीवन बदलणारे

सर्वाधिक निधी उभारणार्‍या एनजीओ

1. श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर । 20,00,18,489 रुपये

2. सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्ट । 17,98,94,863 रुपये

3. युनायटेड वे मुंबई । 4,22,70,110 रुपये

4. लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट । 3,42,67,240 रुपये

5. ईशा एज्युकेशन । 1,45,51,985 रुपये

सर्वाधिक निधी उभारणारी कॉर्पोरेट टीम

1. जसनी ज्वेलरी (युनिट टू) । 4,02,00,000 । श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर

2. गोदरेज आणि बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड  । 82,55,754 । एनएसीईओएच, एनसीसी एक्स्पा आणि वॉर वुंडेड फाउंडेशनसाठी

3. मी-हिन टेक एज सोल्यूशन्स । 16,21,312 रुपये। एडीएचएआरसाठी

- टीएमएम चेंज लीजेंड्स - 1 कोटी आणि त्याहून अधिक वाढवण्याची वचनबद्ध व्यक्ती

एल. मनीषा खेमलानी आणि । 9,94,73,139 रुपये।  सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्टसाठी

एल डॉ. बिजल मेहता । 4,97,55,479 रुपये । श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

एल दर्शिनी भट्ट ।  4,76,36,611 रुपये ।  सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्टसाठी

एल श्याम जसानी । 4,02,00,000 रुपये । श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर

एल विली डॉक्टर । 1,11,70,535 रुपये । लाइट ऑफ लाईफ ट्रस्टसाठी

एल विपुल शहा । 1,07,50,000 रुपये  । श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

एल राजकुमार जैन  । 1,02,50,000  रुपये । श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

एल सुनित कोठारी  । 1,01,00,000  रुपये। श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

एल डॉ. मीरा मेहता  । 1,00,87,144  रुपये । श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

एल उत्पल मेहता । 1,00,50,000 रुपये । श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

- चेंज आयकॉन  - 50 लाख आणि त्याहून अधिक वाढवण्याची वचनबद्ध व्यक्ती

एल.पी.पी.राव मुक्कामला । 93,45,691 रुपये । सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्टसाठी

एल सदाशिव राव । 81,78,663 । ईशा एज्युकेशनासाठी

एल मुरलीकृष्णन ब । 54,28,268 । युनायटेड वे इंडियासाठी

एल मेघना पटेल । 52,88,500 । सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्टसाठी

एल राकेश गांधी । 51,01,001 । श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

- चेंज चॅम्पियन्स - 25 लाख ते 49.99 लाखांच्या दरम्यान उभारण्यासाठी वचनबद्ध असलेल्या व्यक्ती

राजेश पंचमिया ।  42,50,000 रुपये। श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

रेश्मा जैन । 37,83,709 रुपये । श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

असिरा चिरमुले । 33,52,614 रुपये । सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्टसाठी

स्वामी स्वात्मानंद । 31,08,346 रुपये । सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्टसाठी

रुविक कावेडिया । 25,21,000 रुपये। श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

ध्रुव शहा । 25,00,000 रुपये । श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

हेमंत गोशर । 25,00,000 रुपये । श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी

- यंग लीडर्स - 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती किमान 1 लाख रुपयांचा निधी वाढवण्यास वचनबद्ध आहेत

शौर्य गगन बंगा ।  55,50,000 रुपये । चेंज आयकॉन फॉर ऑस्कर फाउंडेशन

एनिसा कोठारी । 28,86,050 रुपये । चेंज चॅम्पियन फॉर श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight