पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार 'खास'

आज्जीबाई जोरात नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी उंची

अभिनेता पुष्कर श्रोत्री हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात.  चित्रपट, मालिकानाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या  पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत आज्जीबाई जोरात या नाटकाने  भन्नाट  योग जुळून आणला आहे  

अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा ३० एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला ५५वा  वाढदिवस  साजरा करत असताना  याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ आज्जीबाई जोरात या नाटकाने करणार आहे. आपल्या ३२ वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत रसिकांची मनं जिंकणारे  पुष्कर या नाटकात अतरंगी’ भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाद्वारे पुष्कर वेगळी उंची गाठणार आहेत. ती उंची कशी गाठणारहे पाहण्यासाठी  आज्जीबाई जोरात हे  नाटक पाहावं लागणार आहे. 

पहिल्यांदाच बालनाट्यात काम करायला मिळणं आणि वेगळा रोल जो मला वेगळ्या उंचीवर नेणार आहे. ते करण्यासाठी उत्सुक असल्याचे पुष्कर यांनी सांगितले. माझ्यासाठी ३० एप्रिल तारीख खास आहेच पण आमच्या आज्जीबाई जोरात या नाटकासाठी सुद्धा तारीख खास ठरावी. नाट्यरसिकांनी उत्तम प्रतिसाद देत आज्जीबाई जोरातचे जोरात स्वागत करावे अशी आशा पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केली. 

लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन आज्जीबाई जोरात हे नवं कोरं AI बालनाट्यरंगभूमीवर घेऊन येतायेत. जिगीषा-अष्टविनायक संस्थेची निर्मिती असलेल्या आज्जीबाई जोरात या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंतपुष्कर श्रोत्रीजयवंत वाडकरमुग्धा गोडबोलेअभिनय बेर्डे अशी कलाकारांची फळी आहे.  हे नाटक विनोदाच्या अंगानं जाणारी फँटसी आहे. दिलीप जाधवचंद्रकांत कुलकर्णी प्रशांत दळवी या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर वेशभूषेची जबाबदारी कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी सांभाळली आहे. संगीत सौरभ भालेराव तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..