'दु:खही आपुले दरवळले, सावलीत ऊन वितळले..... ; 'सुख कळले' मालिकेचे शीर्षक गीत आले प्रेक्षकांच्या भेटीला
'दु:खही आपुले दरवळले, सावलीत ऊन वितळले..... ; 'सुख कळले' मालिकेचे शीर्षक गीत आले प्रेक्षकांच्या भेटीला
आपल्या महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी हे नवे वर्ष साजरे करायला सिद्ध झाली आहे. या नव्या बदलाची सुरूवात ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे करण्यात आली. आता कलर्स मराठीवर 'सुख कळले' ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार.
'सुख कळले' या मालिकेतील माधव -मिथिला म्हणजेच सागर देशमुख आणि स्पृहा जोशीसोबत मालिकेतील अन्य कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले असून रसिकांनी या सर्व कलाकारांना भरभरून प्रेम दिले.
नुकतेच या मालिकेतील शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले.‘दु:खही आपुले दरवळले, सावलीत ऊन वितळले, फिरुनी तुझ्यात बघता स्वतःस वाटले…’सुख कळले‘’,असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचे चित्रीकरण पार पडले. या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून रसिक भरभरून प्रेम करत आहेत. आपल्या प्रेमाने परिवाराच्या दुःखांचे रूपांतर सुखात करणे, परिस्थितीच्या अनेक नवनवीन वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास, प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणे. आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर हासू यावे यासाठी प्रयत्न्न करणे. माधव -मिथिलाच्या निखळ, निःस्वार्थी प्रेमाची ही कथा म्हणजेच ‘सुख कळले! आपल्याकडे प्रत्येक गोष्ट असणे म्हणजे सुख नाही. तर कधीकधी दुसऱ्यांच्या सुखातही आपले सुख असू शकते. दुसऱ्याला खुश ठेवण्यातही सुख असते. माधव आणि मिथिलाचे सुख नक्की कशात आहे? हे सांगणारी कथा म्हणजे 'सुख कळले'. या सगळ्या गोष्टी तुम्हाला शीर्षक गीतात अनुभवायला मिळतील. या गीतावर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांचा आणि प्रेमाचा धुंवाधार वर्षाव होतो आहे..
Watch the Song here: https://www.youtube.com/watch?v=Nq0m2bki5LA
'सुख कळले' हे शीर्षक गीत अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केले. ज्याला निलेश मोहरीर यांच्या संगीताची जोड लाभली. या शीर्षक गीताला अभय जोधपुरकर आणि प्रियांका बर्वे यांनी स्वर दिले. शीर्षक गीताचे प्रोडक्शन देखील ह्या गाण्या येवढेच सुंदर आहे. याचा देखील अनुभा घ्या: https://youtu.be/oa378gYX0lI
या मालिकेची निर्मिती सोहम प्रॅाडक्शन्स यांनी केली आहे. तर सुचित्रा बांदेकर व सोहम बांदेकर हे निर्माते आहेत. 'सुख कळले' मालिकेचे शीर्षक गीत तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आणि यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता. 'सुख कळले' ही मालिका २२ एप्रिलपासून सोम ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर तुम्ही पाहू शकता.
Comments
Post a Comment