श्रीमती ईशा अंबानी पिरामल यांच्या हस्ते डॉ. विजय हरिभक्ती यांचे "बीइंग ब्रेस्ट-अवेअर - व्हॉट एव्हरी वुमन मस्ट नो" या पुस्तकाचे प्रकाशन झाले
मुंबई, ६ एप्रिल, २०२४: श्रीमती. इशा अंबानी पिरामल यांच्या हस्ते डॉ. विजय हरिभक्ती, चेअर, ऑन्को सायन्सेस, सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल यांनी लिहिलेल्या "बीइंग ब्रेस्ट-अवेअर: व्हॉट एव्हरी वुमन मस्ट नो" या अनोख्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक इंडिया ब्रेस्ट मीटिंग २०२४ चा एक भाग म्हणून व स्तनांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने लिहिले गेले आहे.
"स्तन कर्करोगाविरूद्धचा लढा हा अतिशय गंभीर प्रवास आहे, जिथे प्रत्येक उपचार हा रुग्णांसाठी त्यांच्या समर्थनाचा आणि त्यांच्यासाठी आशेचा किरण बनतो. "इंडिया ब्रेस्ट मीटिंग २०२४" च्या माध्यमातून येथे जगभरातील तज्ञांचे ज्ञान आणि अनुभव एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे व आम्हाला आशा आहे की यामुळे कर्करोगाच्या ज्ञानविषयीची व्याप्ती वाढेल आणि स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची काळजी कमी करता येईल संपूर्ण टीमला माझे मनापासून कौतुक आणि आभार. सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये या उपक्रमाचे नेतृत्व करून तसेच उच्च दर्जाची रुग्ण सेवा दिल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद करते " असे श्रीमती ईशा अंबानी पिरामल, संचालक, रिलायन्स म्हणाल्या.
कर्करोग हा प्रमुख मानवी कर्करोग म्हणून उदयास आला आहे आणि त्यातही जगभरातील आणि भारतातील महिलांचा स्तनाचा कर्करोग हा सामान्य कर्करोग दिसून आला आहे. २०२२ मध्ये, २.३ दशलक्ष महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले.
जगभरात या आजाराने ६७०,०००लोकांचा मृत्यू झाला. याचा अर्थ स्तनाचा कर्करोग हा सर्वात जास्त निदान झालेला कर्करोग आहे.जगभरातील महिलांमध्ये, ४ पैकी १ हा स्तनाचा कर्करोग आहे.
स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा संबंधित मृत्यूचे प्रमुख कारण बनला आहे वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे अचूक माहिती देणे आणि त्यावर प्रतिबंध करून लवकर निदान करण्यात मदत करण्याचे साधन म्हणून काम करणे हे या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.
स्तनाच्या कर्करोगाच्या वाढीशी संबंधित, सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल "वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिक" , सेवा प्रदान करते. स्तनाचा संभाव्य किंवा सिद्ध रोग असलेल्या कोणत्याही महिलेला दोन तासांच्या आत सर्वसमावेशक मूल्यांकन, निदान आणि उपचार मार्ग प्राप्त करण्यास मदत करणे हा सर एचएन रिलायन्स फाउंडेशचे उद्दिष्ट आहे.
Comments
Post a Comment