'साऊंड ऑफ इंडिया' हे गायिका 'सावनी रविंद्र'चे  बहुभाषिक मॅशअप गाणे रिलीज

नविन वर्षाचं जल्लोषात स्वागत करतं सुमधुर गळ्याची गायिका 'सावनी रविंद्र' हीने तिच्या चाहत्यांना  सांगितीक भेट दिली आहे. सावनीने 'साऊंड ऑफ इंडिया' नावाचं मॅशअप गाणं तिच्या ऑफिशीअल युट्यूब चॅनेलवर नुकतंच रिलीज केलं आहे. या गाण्याची खासीयत म्हणजे यात तीने भारतातील १५ विविध भाषेतील प्रसिद्ध गाण्यांचा संगम केला आहे.
आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका 'सावनी रविंद्र' मॅशअप गाण्याविषयी सांगते,"आपल्या भारतातील सांगितीक संस्कृती ही प्रचंड समृद्ध आहे. त्यामुळे मी भारतातील काही निवडक १५ भाषेतील प्रसिद्ध गाणी एकत्र करून हे मॅशअप गाणं तयार केलं आहे. भारतातील प्रत्येक राज्यातील भाषा आणि त्या त्या भाषेतील गाण्यांच्या पद्धती ह्या मॅशअपद्वारे प्रेक्षकांना ऐकायला मिळणारं आहेत.
पुढे ती म्हणते, ''या गाण्यात मराठी, कोंकणी, डोंगरी, हिमाचली, राजस्थानी, पंजाबी, बंगाली, कन्नड, तमिळ, मल्याळम, भोजपुरी, आसामी, गुजराती, ओडिआ अश्या १५ भाषेतील गाण्यांचा समावेश केला आहे. माझ्यासाठी हे गाणं खूप स्पेशल आहे. मी आशा करते की हे गाणं सर्व रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की पडेल आणि ते जरूर एन्जॉय करतील."
गायिका सावनी रविंद्र हीने मॅशअप सॉंगद्वारे वर्षाचा  शेवट गोड केला आहे. आता तिने गायलेलं मॅशअप सॉंग रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यात काहीचं शंका नाही.
Youtube Link 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight