आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी सनफिस्ट इंडिया मु्व्ह ॲज वन चे आयोजन #मुव्हफॉरगुड


-सहभागी स्पर्धकाच्या प्रत्येक कि.मी. अंतराला सनफिस्ट मुव्ह ॲज वनच्या वतीने मुलांच्या भवितव्यासाठी २० रुपये

नवी दिल्ली - ३ सप्टेंबर २०२१ -भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७५व्या वर्षानिमित्ताने सनफिस्ट मुव्ह ॲज वन ही योजना १५ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू करण्यात आली. कोविड १९च्या संकटकाळाचा फटका सलेल्या भारतातील आणि जगभरातील भारतीय मुलांना आधार देण्यासाठी या योजनेची सुरवात करण्यात आली.

आशा आणि चांगुलपणा यांना योजनेच्या केंद्रस्थानी मानून मोठा सामाजिक प्रभाव निर्माण करुन जगभरातील नागरिंकाना  स्फूर्ती देताना एकीची ताकद दाखवणारी ही चळवळ सुरु केली. याचे ध्येय्याने प्रेरित होऊन आंतरराष्ट्रीय धर्मादाय (चॅरिटी) दिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी एका प्रेरणादायी उपक्रमाची घोषणा केली.

या उपक्रमातंर्गत सनफिस्ट इंडिया मु्व्ह ॲज वन यात सहभागी प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक हालचालीची नोंद ठेवेल. यात चालणे, धावणे आणि सायकलिंग यांचा समावेश असून, यातील प्रत्येक कि.मी.ला सनफिस्ट इंडिया मुव्ह ऑन एका मुलासाठी २० रुपये देणार आहे. यातून जमा होणारा निधी हा कोविडग्रस्त मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि कल्याणासाठी देण्यात येणार असून, त्यामुळे त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पसरणार आहे.

या उपक्रमाच्या या अखेरच्या पर्वात सहभागी होण्यासाठी आजच १४९ रुपये भरून आपले नाव रजिस्टर करा. सहभागासाठी रजिस्ट्रेशन १३ सप्टेंबर २०२१ पर्यंच सुरु असेल. १५ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू झालेली ही चळवळ १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. सर्व सहभागींना ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत निधी गोळा करण्याची संधी असेल. अधिक माहितीसाठी sunfeastindiamoveasone.procam.in  या संकेतस्थळावर लॉग इन करा.

दिग्गज धावपटू हेल गॅब्रेसेलेसी हा या सनफिस्ट इंडिया मुव्ह ॲज वन या योजनेचा ब्रॅंड अॅम्बेसिडर आहे. त्याने या योजनेचे स्वागत केले आहे. तो म्हणतो, या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि आमच्या मुलांच्या भविष्यातील आनंदासाठी पुढे येणाऱ्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस हा आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याची शक्ती देणारा दिवस आहे. सामाजिक बांधिलकी जपून आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याची ताकद या उपक्रमात आहे. त्यासाठी पहिले पाऊल टाकण्याची गरज आहे. त्यासाठी धर्मादाय दिवसाचा योग साथून आपण व आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने मित्रांसह यात नोंदणी करा. चला तर मग धावा, चाला, सायलिंग करा आणि तो अतिरिक्त मैल गाठा की तुमचा प्रत्येक कि.मी. या योजनेत महत्वाचा ठरणार आहे. जगभरातून विविध क्षेत्राील मान्यवरांच्या अखंडित पाठिंब्यामुळे चळवळ प्रचंड वेग घेत आहे. यात गुरुदेव श्री श्री रविशंकर, अभिनेता राहुल बोस, पिया पिल्ले, तारा शर्मा, सामाजिक कार्कर्त्या प्रिया दत्त, ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक, क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमार, टेनिपसू रोहन बोपण्णा करमन कौर आशियाई विजेता टी गोपी यांचा समावेश असून, प्रत्येकाने जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचण्यासाठी जास्तीत जास्त कि.मी. धावले पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त शाळा, उद्योजक, धावणाऱ्यांचा ग्रुप, सायकलस्वार यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हायला हवे. सहभागी होताना या प्रत्येकाने जास्तित जास्त अंतर कापण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे. एका चांगल्या कार्यासाठी आपण एकत्र आलो आहोत हे दाखवून द्यायचे आहे.

आयटीसी कंपनीच्या  बिस्किट, केक फूडस डिव्हिजनचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अली हॅरिस शेरे म्हणाले, सनफिस्ट इंडिया मुव्ह ॲज वनसाठी आतापर्यंत मिळालेला  प्रतिसाद खूप मोठा आहे. या प्रतिसादामुळे आमचा उत्साह वाढला आहे. या चळवळीचा खूप मोठा सामाजिक परिणाम साधला जाणार आहे. या आघाडीवर काम करताना आम्ही दोन आघाड्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. यातील पहिला भाग म्हणजे सहभागी झालेल्यांना एका सामाजिक कामात योगदान देण्याची संधी प्रदान करणे आणि दुसरा भाग म्हणजे या सामाजिक कार्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे. समाजातील अशा वैचारिक प्रयत्नांमुळे आम्ही कोविडने प्रभावित झालेल्या मुलांना काही प्रमाणात सक्षम करू शकतो अशी आशा आहे.

गिव्ह इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत तायल म्हणाले, सनफिस्ट इंडिया मुव्ह ॲज ऑनच्या २०२१च्या चळवळीसाठी गिव्ह इंडियासोबत सहयोग सुरू ठेवल्याबद्दल आम्ही प्रोकॅम इंटरनॅशनलचे आभारी आहोत. कोविडची दुसरी लाट भारतातील अनेक मुलांसाठी दुःखद आहे. हजारो लोकांनी आपल्या कुटुंबातील जवळच्या सदस्याला गमावले आहे. लाखो मुलांची शिक्षण आणि उत्तम आरोग्याची संधी गमावली आहे. या मोहिमे द्वारे कोविडग्रस्त मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य, करियर मार्गदर्शन, कौशल्य निर्माण करण्यासाठी आणि मुलभूत वैद्यकीय सेवां उपलब्ध करण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या चळवळीचा भाग बनावे.

सनफिस्ट इंडिया मुव्ह ॲज  वन या उपक्रमाबद्दल बोलताना प्रो कॅम इंटरनॅशनल व्यवस्थापकीयसंचालक विवेक सिंग म्हणाले, समुदाय, निरोगीपण आणि सामाजिक प्रभाव या तीन भक्कम विचारांवर ही चळवळ उभी आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्यांना आंतरराष्ट्री धर्मादाय दिवसानिमित्त आम्ही प्रत्येक पाऊल मोजण्याची आणखी एक संधी देणार आहोत. या दिवशी तुमच्या प्रत्येक कि.मी. अंतराला आम्ही २० रुपये मुलांसाठी बाजूला काढणार आहोत. यासाठी आमच्या मोहिमेत जास्तीत जास्त संख्यने सामील व्हा.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight