झुनो जनरल इन्शुरन्स

झुनो जनरल इन्शुरन्स’च्या वतीने उद्योगातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल ॲड-ऑन कव्हर

मुंबई, 22 नोव्हेंबर 2023: झुनो जनरल इन्शुरन्स या नवीन डिजिटल युगातील विमा कंपनीने आज पहिल्यांदाच नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) ॲड-ऑन कव्हर लॉन्चची घोषणा केली असून विमा उद्योगातील हे अशाप्रकारचे पहिले विमा कवच ठरले. हा क्रांतिकारी प्रस्ताव विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांना सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करण्यासाठी तसेच त्यांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला.

गतिशीलता (मोबिलिटी)चे भविष्य इलेक्ट्रिक असून झुनो EV मालकांना मनःशांती आणि सर्वसमावेशक संरक्षणासह सक्षम करणारे नाविन्यपूर्ण विमा उपाय प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वैशिष्ट्ये ओळखून, झुनो’ने उद्योगात प्रथमच ईव्ही ॲड-ऑन कव्हर श्रेणी विकसीत केली. ही मोटर विमा परिघाची पुनर्कल्पना करण्यात साह्यकारी ठरेल.

झुनो जनरल इन्शुरन्स’चे ईव्ही ॲड-ऑन कव्हर विचारपूर्वक त्याच्या मानक खासगी कार पॉलिसीकरिता पूरक आणि विशेषत: इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या पहिल्या पॉलिसी वैशिष्ट्यांसह, EV ॲड-ऑन कव्हरमध्ये EV मालकांना एक मजबूत आणि अनुकूल विमा संरक्षण मिळत असल्याची खात्री करण्यासाठी तीन आवश्यक घटक समाविष्ट आहेत:

प्रायव्हेट चार्जिंग स्टेशन कव्हर (उद्योगक्षेत्रात प्रथमच)

अपघाती नुकसान आणि चोरीपासून संरक्षणासाठी चार्जिंग केबल, कनेक्टर, अडॅप्टर आणि सर्व मानकप्राप्त चार्जिंग उपकरणे समाविष्ट करण्यासाठी कवचाचा विस्तार.

खासगी-मालकीच्या चार्जिंग स्टेशनसाठी सर्वसमावेशक कवच/कव्हरेज केवळ विमा उतरवलेल्या वाहनांना चार्ज करण्यासाठी, त्यांना आग, चोरी आणि अपघात नुकसानापासून सुरक्षित करण्यासाठी वापरले जाते – हे कवच देखील उद्योगात प्रथमच समाविष्ट करण्यात आले आहे.

वैयक्तिक अपघात कवच – EV मालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अग्रगण्य भर (उद्योगक्षेत्रात प्रथमच)

विमा उतरवलेले वाहन चार्ज करताना खासगी चार्जिंग स्टेशनवर आग, स्फोट किंवा शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या दुखापती किंवा मृत्यूसंबंधी प्रकरणांसाठी वैयक्तिक अपघात कवच जोडण्याचा पर्याय ग्राहकाकडे असेल.

बॅटरी कवच

बॅटरी चार्ज करत असताना किंवा वाहन चार्जिंग स्टेशनवर पार्क केलेले असताना आग, सेल्फ-इग्निशन किंवा शॉर्ट सर्किटमुळे विमाधारक वाहनाचे नुकसान किंवा नुकसान यासाठी कवच प्रदान करणे (उद्योगक्षेत्रात प्रथमच)

विमा उतरवताना नमूद करण्यात आलेले धोके/ शॉर्ट सर्किटमुळे पाणी शिरल्याने बॅटरी किंवा बॅटरीच्या काही भागांचे परिणामी नुकसान झाल्यास बॅटरी संरक्षण.

लॉन्चवर भाष्य करताना, झुनो जनरल इन्शुरन्स’चे एमडी आणि सीईओ शनाई घोष म्हणाले, "ईव्ही ॲड-ऑन कव्हरचा परिचय EV आधारित मोटर विमा पोर्टफोलिओ तयार करण्याच्या आमच्या धोरणात्मक उद्दिष्टाशी सुसंगत आहे. आमचे इलेक्ट्रिक वाहन ॲड-ऑन इलेक्ट्रिक वाहन मालकांच्या अनन्य गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली उद्योगातील प्रथमच सादर करण्यात आलेल्या वैशिष्ट्यांसह विमा संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

ग्राहकांचे स्वारस्य इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात वाढल्याने, मानसिकतेतील हा बदल उद्योगात नाट्यमय बदल घडवून आणेल. नाविन्यपूर्ण, उद्योगात-प्रथमच सादर करण्यात आलेला ॲड-ऑन प्रस्ताव या संक्रमणास समर्थन देणे हे आमचे ध्येय आहे. या प्रस्तावामुळे अधिकाधिक लोकांना इलेक्ट्रिक वाहने आत्मविश्‍वासाने स्वीकारण्यास केवळ प्रोत्साहनच मिळणार नाही तर ईव्हीचा व्यापक अवलंब करणे, विमा पद्धत पुनर्परिभाषित करणे आणि आमच्या ग्राहकांचे अनुभव सुलभ करण्यातही ते योगदान देतील,” असे शनाई पुढे म्हणाले.

EV ॲड-ऑन कव्हर सादर करून, ग्राहकांना भविष्यातील वाहनांसाठी नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक उपायांची उपलब्धता सुनिश्चित करून, झुनो डिजिटल विमा क्षेत्रात आघाडीवर आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight