पियाजिओ आपे आयसीई तीन-चाकींच्‍या किंमतीमध्‍ये १ जानेवारी २०२४ पासून वाढ

पियाजिओ आपे आयसीई तीन-चाकींच्‍या किंमतीमध्‍ये १ जानेवारी २०२४ पासून वाढ 

पुणे19 डिसेंबर 2023: पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) ही इटालियन ऑटो कंपनी पियाजिओ ग्रुपची १०० टक्‍के मालकीची उपकंपनी आणि भारतातील स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍सची आघाडीची उत्‍पादक कंपनी १ जानेवारी २०२४ पासून त्‍यांच्‍या तीन-चाकी इंटर्नल कम्‍बशन इंजिन (आयसीई) वाहनांच्‍या आपे ब्रॅण्डच्‍या किमतीमध्‍ये वाढ करणार आहे. प्रमाणित किंमत वाढ डिझेलसीएनजीएलपीजी व पेट्रोलमध्‍ये कार्गो आणि पॅसेंजर आपे वेईकल्‍सना लागू असेल. भारतातील सध्‍याच्‍या एक्स-शोरूम किंमतीमध्‍ये साधारण ६००० रूपयापर्यंतची वाढ करण्‍यात येईल. 

आपले मत व्‍यक्‍त करत पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. येथील सीव्‍ही डॉमेस्टिक बिझनेस (आयसीई) व रिटेल फायनान्‍सचे कार्यकारी उपाध्‍यक्ष श्री. अमित सागर म्‍हणाले, ''यंदा सणासुदीच्‍या काळात आमच्‍या तीन-चाकींना उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहेजेथे विक्रीमध्‍ये ३८ टक्क्‍यांहून अधिक वाढ झाली. सीएनजीच्‍या पूर्ण भरलेल्‍या ४०-लीटर टाकीमध्‍ये उद्योगामध्‍ये पहिल्‍यांदाच ३०० किमीपर्यंतची रेंज देणारी आपे एनएक्‍सटी+ सारख्‍या नवीन सादर करण्‍यात आलेल्‍या वाहनांनी देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतलेज्‍यामुळे आमच्‍या प्रॉडक्‍शन लाइन्‍स व्‍यस्‍त होत्‍या. आम्‍हाला उत्‍पादनामध्‍ये वाढ होत राहण्‍याची अपेक्षा आहेज्‍याचे श्रेय आपे  वेईकल्‍सच्‍या अविश्‍वसनीय व उच्‍च-कार्यक्षम श्रेणीला जाते आणि ही सुविधा आपेच्‍या कोणत्‍याही इंधन प्रकाराच्‍या वेईकल्‍समध्‍ये मिळते.''  

ते पुढे म्‍हणाले, ''२०२३ मध्‍ये महामारीच्‍या प्रादुर्भावामधून बाहेर पडल्‍यानंतर आम्‍ही महागाई व कच्च्या

माल खर्चाच्‍या परिणामाचा सामना करत असताना, ग्राहकांसाठी किमतीमध्‍ये कोणतीही वाढ केली नव्‍हती. आपेच्‍या प्रमाणित किंमतीमध्‍ये १ जानेवारी २०२४ पासून वाढ होणार असल्‍यामुळे आम्‍ही ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विद्यमान किमतीचा अधिकाधिक फायदा घेण्‍याचे आवाहन करतो. शेवटीआपे उद्योजकांसाठी सर्वोत्तम वेईकल व व्‍यवसाय सहयोगी ठरली आहे.''  

३ दशलक्षहून अधिक ग्राहकांचा विश्‍वास असलेला व्‍यावसायिक तीन-चाकींचा आपे ब्रॅण्‍ड २५ वर्षांपासून लोकप्रिय आहे. २०२३ ची सांगता होत असताना ग्राहकांनी भारतातील जवळच्‍या पियाजिओ डिलरशिपमध्‍ये जाऊन ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत त्‍यांच्‍या आवडीची आपे सर्वोत्तम व कमी किंमतीत खरेदी करण्‍याचा आनंद घ्‍यावा.  

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..