भव्य ‘मराठी सेलिब्रिटी डांडिया’ महोत्सव ठाणे: कलाकारांसोबत सण साजरा करण्याची संधी!

भव्य ‘मराठी सेलिब्रिटी डांडिया’ महोत्सव ठाणे: कलाकारांसोबत सण साजरा करण्याची संधी!

ठाण्यातील भगवती शाळा, भगवती मैदान, विष्णूनगर, नौपाडा, तीन हात नाका, ठाणे (प) येथे ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान, संध्याकाळी ७ ते १० या वेळेत भव्य ‘मराठी सेलिब्रिटी डांडिया’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. CastingVibe - Digital Casting Platform यांच्या आयोजनात आणि श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान ठाणे नवरात्र मंडळ यांच्या सहकार्याने हा खास सोहळा साकारला जात आहे.

या कार्यक्रमात मराठी टीव्ही मालिकांतील आणि चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार आपली उपस्थिती लावणार आहेत. कलाकारांनी डांडियाचा आनंद लुटण्याची इच्छा व्यक्त केली असून, प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांसोबत सण साजरा करण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

या महोत्सवात सहभागी होणारे कलाकार मराठी मनोरंजनसृष्टीतील सध्या कार्यरत असलेले आणि पूर्वीपासून लोकप्रिय असलेले आहेत. या कार्यक्रमाचा अनुभव प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे, कारण त्यांना डांडियासह मनोरंजनाचा दुहेरी आनंद मिळणार आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे आणि डांडियाचा आनंद लुटण्यासाठी कोणतेही तिकीट नाही. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि डांडियाचा थरार अनुभवण्यासाठी, ठाणेकरांनी या महोत्सवात सहभागी होण्याची संधी साधावी!

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO