मुंबईत भारतातील पहिल्या भ्रमाच्या दुनियेचा शोध पॅराडॉक्स म्युझियम येथे

मुंबईत भारतातील पहिल्या भ्रमाच्या दुनियेचा शोध घ्या,पॅराडॉक्स म्युझियम येथे  

मुंबई, भारत, 3 ऑक्टोबर 2024: परस्परसंवादी आणि गुंतवून ठेवणाऱ्या प्रदर्शनासाठी ओळखला जाणारा जागतिक स्तरावरील प्रसिद्ध ब्रँड, द पॅराडोक्स म्युझियमने मुंबईत भारतातील अशाप्रकारचे पहिले संग्रहालय अधिकृतपणे सुरू केले आहे. या संग्रहालयात 55 हून अधिक अद्वितीय विरोधाभासी-संकल्पनेवर असलेली प्रदर्शने आणि 15 गुंगवून ठेवणाऱ्या खोल्या आहेत. ज्यात मनाला भुरळ पाडणारी आणि नेत्रदीपक अनुभवांची अतुलनीय श्रेणी आहे. इथे भेट देणाऱ्या व्यक्ती परस्परसंवादी प्रदर्शनाच्या जगात स्वतःला रममाण करू शकतील. या  ठिकाणी प्रकाशीय भ्रमांमागील आकर्षक विज्ञान उलगडून पाहता येईल. मुंबईतील पॅराडोक्स म्युझियमची तिकिटे 4 ऑक्टोबरपासून (https://paradoxmuseummumbai.com/) येथे उपलब्ध असतील.  

चर्चगेट आणि सीएसएमटी स्थानकांपासून केवळ थोड्या अंतरावर असलेल्या दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरात वसलेले हे संग्रहालय भेट देणाऱ्यांकरिता वास्तवाच्या पलीकडे जाण्यासाठी आणि विरोधाभासी जगाच्या 60 मिनिटांच्या शोधासाठी प्रोत्साहित करते. रिव्हर्स रूमचा अनुभव नेत्रदीपक ठरतो, जो तुमच्या वास्तविकतेबद्दलच्या आकलनाशी खेळतो; इथला पॅराडोक्स सोफा एक चित्तवेधक भ्रम निर्माण करतो. तुम्हाला त्याच्या रचनेशी विलीन होण्यासाठी आणि जागा तसेच आकाराच्या मर्यादांना न जुमानता आमंत्रित करतो; आणि झीरो ग्रॅव्हीटी रूम ही अशी जागा आहे जिथे वास्तव झुकते आणि वजनहीनतेचा थरार तुमच्या प्रत्येक हालचालीचे गुरुत्वाकर्षण-विरोधी साहसात रूपांतर करतो जे एखाद्या विज्ञान कल्पित स्वप्नामध्ये पाऊल टाकण्यासारखे वाटते. कॅमोफ्लेज रूम तुमच्या सभोवतालच्या परिसरात अखंडपणे मिसळते, तर पॅराडोक्स टनल तुमच्या इंद्रियांना अस्वस्थ करतो, ज्यामुळे सरळ चालणे अशक्य वाटते कारण चरत्या नळीमुळे तुमची गुरुत्वाकर्षणाची धारणा वळते आणि अमेस रूम एक ऑप्टिकल इल्यूजन निर्माण करते. जिथे तुम्ही हलत असताना वस्तू आकार बदलताना दिसतात, एका विशिष्ट दृष्टिकोनातून घन दिसतात.

पॅराडोक्स म्युझियम एक चित्तवेधक शैक्षणिक अनुभव देण्यासाठी विज्ञान, कला आणि मानसशास्त्राचे कलात्मकपणे विलीनीकरण करते. या माध्यमातून कुटुंबातील लहान मुलांमध्ये कुतूहल जागे करण्यासोबत त्यांना प्रोत्साहन मिळते आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी हे संग्रहालय आदर्श आहे. हे ठिकाण कॉर्पोरेट सांघिक उभारणीशी क्रियाकलापांना उत्तम संधी देखील प्रदान करते. संस्मरणीय रिल्स आणि फोटोंसाठी इंस्टाग्रामवर शेअर करण्यायोग्य स्पॉट अभिमानाने माहिती सांगणाऱ्या कंटेंट क्रिएटरसाठी एक हॉटस्पॉट आहे.

भारतातील अशाप्रकारच्या पहिल्या-वहिल्या मुंबईतील संग्रहालयाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना, संस्थापक मिल्टोस कँबोरिड्स म्हणाले, "भारतातील पॅराडोक्स म्युझियमच्या पदार्पणाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. मुंबईसारख्या चैतन्यमय शहरात ही सुरुवात होते आहे. या संग्रहालयात लक्षवेधी प्रदर्शनांची एक श्रेणी आहे, जी तुमच्या आकलनास आव्हान देईल आणि वास्तविकतेवर एक नवीन दृष्टीकोन देईल. मुंबईचे गतिमान वातावरण या नाविन्यपूर्ण अनुभवासाठी परिपूर्ण पार्श्वभूमी उपलब्ध करते. जे सर्वच क्षेत्रातील भेट देणाऱ्यांना आकर्षित आणि आनंदित करण्याचे आश्वासन देते. मुंबईच्या मध्यभागी आश्चर्य आणि शोधाचे जग शोधण्यासाठी तयार व्हा!"

पॅराडोक्स म्युझियमचे सीईओ श्री. हॅरिस डौरोस पुढे म्हणतात, "भारतातील पॅराडोक्स म्युझियम तुमच्या समजुतीला आव्हान देणाऱ्या आणि वास्तविकतेवर नवीन दृष्टीकोन देऊ करणाऱ्या मनोरंजक प्रदर्शनांची एक श्रेणी सादर करते. संग्रहालयाचा हा नाविन्यपूर्ण अनुभव मंत्रमुग्ध करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी तयार आहे, जो शोधाच्या एका अनोख्या प्रवासाचे आश्वासन देतो.

पॅरिस, मियामी, स्टॉकहोम यासारख्या प्रमुख शहरांमधील ठिकाणे आणि लंडन, शांघाय आणि बर्लिनमधील अलीकडील उद्घाटनांसह, 2022 मध्ये मिल्टोस कॅम्बोराइड्स आणि साकिस टॅनिमनिडिस यांनी स्थापन केलेले पॅराडोक्स म्युझियम लवकरच जागतिक सनसनी ठरले. यंदा जुलैमध्ये लंडनमध्ये झालेल्या या ब्रँडच्या अखेरच्या लॉन्चने वेगवान विस्तारावर प्रकाश टाकला आहे. ज्यामुळे तो मुंबईकरांसाठीही करमणुकीच्या दृश्यात एक रोमांचक भर घालतो. जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या नाविन्यपूर्ण संग्रहालयाचा अनुभव घेण्याची संधी गमावू नका!

पॅराडोक्स म्युझियम शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येईल. इथे भेट देणाऱ्यांना विलक्षण प्रदर्शनांचा शोध घेण्यासोबत जगाचा वेध घेण्याकरिता आमंत्रित करण्यात येते. जे धारणा आणि वास्तववादी आश्चर्यकारक मार्गांनी गुंफलेले आहे. 

हे संग्रहालय सोमवार ते रविवार सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले असेल. पॅराडोक्स म्युझियमच्या संकेतस्थळावर आणि आघाडीच्या तिकीट आरक्षण मंचांवर तिकिटे उपलब्ध आहेत, ज्याची किंमत खालीलप्रमाणे आहेः 

.लहान मुले (वयोगट 3-12 वर्षे)     -         550 + GST 

.प्रौढ (12+ वर्षीय)               -         590 + GST

.ज्येष्ठ नागरिक (60+ वर्षीय)         -         550 + GST

.परदेशी नागरिक                         -         890 + GST 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..