गायिका जाई देशमुखचे ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण!

बिग बाँस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाणं प्रदर्शित!

हृदयाला गोड स्पर्श करणारी शाळेतल्या पहिल्या निरागस प्रेमाची गोष्ट दर्शवणारं ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा!

गायिका जाई देशमुखचे ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण!

प्रेमाने हृदयाला गोड स्पर्श करणार ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं भावनिक, प्रेमळ आणि रोमांचक असून या गाण्यात बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुख हे प्रमुख कलाकार आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध गायिका जाई देशमुख यांनी गायलं असून अमेय मुळे यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. तर या गाण्याची गीतरचना सुप्रसिद्ध गीतकार अंबरीष अरुण देशपांडे यांनी केल आहे. त्यांनी या आधी १५ हून अधिक चित्रपटांचे गीत लेखन तसेच ३० हुन अधिक युट्युब सिंगल्स, अनेक जींगलस् आणि जाहिरात लेखन केले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन अमोल तुमणे याने केलं आहे. या गाण्याची निर्मिती सुप्रसिद्ध गायिका जाई देशमुख यांनी केली आहे.

अभिनेता आदिश वैद्य ‘कशी ओढ’ गाण्याविषयी सांगतो, “मला या गाण्याची विचारणा केली असता मी हे गाण ऐकताच क्षणी होकार दिला. गाण्याच्या चित्रीकरणावेळी सेटवर खूप मज्जा मस्ती केली. गाण्याच्या रिहर्सलला मला वेळच मिळाला नव्हता. परंतु गाण्याच्या चित्रीकरणावेळी मला खूप टेन्शन आल होत. मी आणि जाईने मिळून एकाच टेकमध्ये शूट पूर्ण केले. त्यामुळे गम्मत म्हणजे पॅकअप करून सगळ्यांना वेळेत घरी जाता आल. सोशल मीडियावर गाण्याच्या टीज़र ला आणि गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार.”

गायिका, अभिनेत्री आणि निर्माती जाई देशमुख तिच्या पहिल्या वहिल्या ‘कशी ओढ’ या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, ”मी ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण करत आहे. या आधी मी भरत जाधव यांच्यासोबत पुन्हा सही रे सही या नाटकात मी मीरा ही भूमिका साकारली आहे. या नाटकाच दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केल आहे. शिवाय अशोक पत्की यांनी मला तुकाराम चित्रपटात पार्श्वसंगीत गाण्याची संधी दिली. अभिनय, गायन आणि निर्माती म्हणून प्रोडक्शन सांभाळण हे जबाबदारीच काम होत. पण यातून खूप शिकायला मिळाल. पहिलच गाण आणि ते ही ‘पॅनोरमा म्युझिक’ सारख्या नामांकित रेकॉर्ड लेबलने घेण हे सर्वच माझ्यासाठी स्वप्नवत होत. शाळेतल पहिल निरागस प्रेम या गाण्यातून एस्थेटिकली दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय आणि मी आशा करते की हे गाण प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

Link - https://youtu.be/D4HxI8Yb0OU?si=rczfjR6eGmbuatHY

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Locked, loaded, and live, Steven Seagal's 'Black Dawn' unleashes fury on &flix Action 2024