पोस्टमन फिल्मस प्रस्तुत ‘पॅटिस’ मराठी चित्रपट

पॅटिस... प्रेमाची लव्हेबल मेजवानी

अनेकांच्या आवडीच्या खादयपदार्थांमध्ये पॅटिसचा अवश्य समावेश असतो. गरम, खमंग पॅटिस म्हणजे खवय्यांसाठी  मेजवानीच असते. प्रेमाचंही असंच काहीसं असतं. विश्वास आणि आपुलकीचं सारण छान जमून आलं की प्रेमाची लज्जत अजून वाढते. लव्हेबल प्रेमाची अशीच चटकदार मेजवानी असलेला पोस्टमन फिल्मस प्रस्तुत ‘पॅटिस’ हा हटके शीर्षकाचा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मीती डॉ. मानिगंडन मंजुनाथन आणि राहुल पाटील यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन धीरज आदिक यांचे आहे.

 

प्रत्येकाच्या प्रेमात एक वेगळीच कहाणी दडलेली असते. अनेक रंजक वळणे घेत खुलणाऱ्या पॅटिसच्या प्रेमकथे मध्येही काही गोष्टींचा उलगडा होणार आहे. हा उलगडा नेमका कोणता? व तो कसा होणार? याची रोमांचक कथा म्हणजे ‘पॅटिस’ चित्रपट. या सस्पेन्स लव्हस्टोरीत बिपीन सुर्वे आणि श्रेया देशमुख ही नायक-नायिकेची नवी जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांसोबत अनेक दिग्गज कलाकार तसेच ओमकार बोत्रेअश्विनी भांडेविनोद खेडकर हे सहाय्यक कलाकार चित्रपटात झळकणार आहेत. पॅटिसचे चित्रीकरण बनारस आणि मनाली (हिमाचल प्रदेश) येथे लवकरच सुरु होणार आहे.

 

पॅटिस चित्रपटाचे संवाद वैभव घोडेस्वार यांनी लिहिले आहेत. छायांकन के. विजय यांचे तर संगीत प्रज्वल यादव  यांचे आहे. कला दिग्दर्शनाची जबाबदारी नितेश नांदगावकर यांनी सांभाळली आहे.

 

हे चटकदार ‘पॅटिस’ प्रत्येकाचे निखळ मनोरंजन करेल अशा विश्वास निर्मातादिग्दर्शक व्यक्त करतात.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..