राज पेट्रो स्पेशॅलिटीज प्रा. लि.

राज पेट्रो स्पेशॅलिटीज प्रा. लि. ला ॲग्री स्प्रे ऑइल्ससाठी नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रॉडक्शन सर्टिफिकेशन

मुंबई, 4 एप्रिल 2022 – राज पेट्रो स्पेशॅल्टीज प्रा. लि. या ब्रेनटॅग समूहाच्या कंपनीला ॲग्री स्प्रे ऑइल्ससाठी नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रॉडक्शन सर्टिफिकेशन मिळाले आहे. उत्तराखंड स्टेट ऑरगॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी (युएसओसीए), या राज्य सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या आणि ऑरगॅनिक खाद्यपदार्थ प्रमाणित करणाऱ्या कंपनीतर्फे हे प्रतिष्ठित प्रमाणपत्र मिळाले आहे.

तीन उत्पादनांना मान्यता मिळाली असून त्यात क्रायरोस ॲग्रीस्प्रे ई-3 ऑइल, कायरोस ड्युराटेक ॲग्रीस्प्रे ऑइल्स आणि कायरोस केलेओल ॲग्रीस्प्रे ऑइल यांचा समावेश आहे. क्रायरोस ॲग्रीस्प्रे ई-3 ऑइल शेती, फलोत्पादन आणि फुलशेतीसाठी वापरले जाते. ड्युराटेक ॲग्रीस्प्रे ऑइल्स सफरचंदांसाठी खास बनवण्यात आले असून ते रेड माइट्स आणि सान्जोसे स्केलविरोधात त्यांचा बचाव करते. केलेओल ॲग्रीस्प्रे ऑइल्स केळ्याच्या पिकासाठी खास तयार करण्यात आले असून ते योग्य बुरशीनाशकासह मिसळून वापरल्यास लीफ स्पॉट आजाराचे प्रभावी व्यवस्थापन करते.

राज पेट्रो स्पेशॅलिटीज प्रा. लि. जगभरातील काही मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांना शेतीशी संबंधित स्प्रे ऑइल्ससाठी हे प्रमाणपत्र मिळाले आहे. पर्यावरणाची जपणूक करणे व शेतकऱ्यांना शेतीतून नफा मिळवण्यासाठी योग्य मूल्य देणाऱ्या सुविधा पुरवणे हे कंपनीचे ध्येय आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी कंपनीने आपल्या उत्पादनांची व्याप्ती सर्व शेती उत्पादने ऑरगॅनिक असल्याचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या सिक्कीम या जगातील पहिल्या ऑरगॅनिक राज्यात विस्तारण्याचे ठरवले आहे. जगभरात ५१ नामांकने मिळवत सिक्कीमने प्रतिष्ठित फ्युचर पॉलिसी गोल्ड अवॉर्डमध्ये युएन फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (एफएओ) जिंकले आहे. एनपीओपी सर्टिफिकेट मिळाल्यावर राज पेट्रो स्पेशॅल्टीज प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक मेहुल नानावटी म्हणाले, ‘आमच्या उत्पादनांसाठी हे प्रमाणपत्र मिळाल्याचा अभिमान वाटतो. राज पेट्रोची ॲग्री- स्प्रे उत्पादने पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाविषयी सजग आहेत. ही उत्पादने ग्राहक तसेच पर्यावरणासाठी धोकादायक असलेली घातक रसायने व कीटकनाशकांसाठी पर्याय आहेत. केलेओल स्प्रे ऑइल्सची तमिळ नाडू येथील इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्चच्या (आयसीएआर) नॅशनल रिसर्च सेंटर फॉर बनानात्रफे (एनसीआरबी) तपासून प्रमाणित करण्यात आली आहेत. ड्युराटेक स्प्रे ऑइल्सची शेर-आय- काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्स अँड टेक्नोलॉजी, श्रीनगर तसेच डॉ. वाय. एस. परमार युनिव्हर्सिटी ऑफ हॉर्टीकल्चर अँड फॉरेस्टी, सोलनतर्फे तपासण्यात आणि प्रमाणित करण्यात आली आहेत.’

ते पुढे म्हणाले, ‘सध्याच्या परिस्थितीने राज पेट्रो स्पेशॅल्टीज प्रा. लि. ला नाविन्यपूर्ण आणि सेंद्रीय शेतीसाठी पारंपरिक कीटकनाशकांना पर्यायी पर्यावरणपूरक उत्पादने तयार करत राहाण्याची प्रेरणा दिली.’

राज पेट्रो स्पेशॅल्टीज प्रा. लि.च्या शेतीव्यवसाय विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मधुकर व्ही पोतदार म्हणाले, ‘ॲग्री स्प्रे ऑइल्स अत्याधुनिक हरित उत्पादन असून ते किफायतशीर, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक आहे. युएसओसीएने (उत्तराखंड स्टेट ऑरगॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी) आम्हाला सर्वोत्तम शाश्वत शेती सुविधा पुरवण्यात एक पाऊल पुढे टाकण्यास मदत केली आहे. ही ऑइल्स पिके, माती आणि माणसांसाठीही सुरक्षित आहेत.’

गेल्या दोन वर्षांत सेंद्रीय खाद्यपदार्थ वेगाने लोकप्रिय झाले आहेत. भारतातील सेंद्रीय उत्पादकांच्या मते सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या उत्पादनांची परदेशी तसेच भारतीय बाजारपेठेतील मागणी चांगल्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहक विविध कारणांमुळे ऑरगॅनिक पदार्थांचा अवलंब करत असून त्यात कीटकनाशकांचा कमी वापर, आरोग्याला मिळणारे फायदे तसेच पर्यावर व प्राण्यांचे हित यांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..