एअर कंडिशनर- गोदरेज अप्लायन्सेस

या उन्हाळ्यात जास्त वीज न वापरता तुमच्या एसी मधून अधिकाधिक गारवा मिळवण्यासाठीच्या क्ल्युप्त्या

लेख श्रेय: श्री संतोष सलियनउत्पादन गट प्रमुख-एअर कंडिशनर- गोदरेज अप्लायन्सेस


तापमानात वाढ होत असल्याने अनेक भारतीय शहरांमध्ये वर्षानुवर्षे कडक उन्हाळा जाणवत आहे. या तीव्र उष्णतेमध्ये ऑफिसमध्ये दीर्घ काळ काम करून तुम्ही घरी आलात किंवा तुम्ही घरून काम करत असाल तर तुम्हाला आरामदायी आणि उत्पादनक्षम वाटण्यासाठी उकाड्यावर मात करणारे अनुकूल वातावरण आवश्यक आहे.

 

कडक उन्हाळ्याच्या प्रारंभासह आपण योग्य एअर कंडिशनर वापरण्याबाबत काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्या कार्यक्षमतेकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. थोडी काळजी आणि देखभाल केल्याने तुमचा एसी उर्जेच्या बिलात बचत करताना आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करू शकतो आणि तुमचा उन्हाळा आरामदायी ठेवू शकतो. एअर कंडिशनरची काळजी घेण्याकरता तुमच्यासाठी काही सोप्या पायऱ्या खाली सूचीबद्ध केल्या आहेतत्यामुळे तुमचा एसी तुम्हाला कडक उन्हाळ्यातही सुखावह थंडावा देत राहतो तसेच उर्जेच्या वापरामध्ये कार्यक्षमता देखील सुनिश्चित करतो.

·         सुरुवातीला उन्हाळा सुरू होण्यापूर्वीतुमच्या एसी साठी प्रतिबंधात्मक देखभाल सेवा करणे अत्यंत उचित आहे. यामुळे तुमचा एसी सर्वोत्तम कामगिरी करेल आणि  ऐन कडक उन्हाळ्यात तुम्हाला काम करत नसलेल्या एसीमध्ये अडकून पडावे लागणार नाही.

·         तुमच्या एसीचे एअर फिल्टर स्वच्छ असल्याची खात्री करा जेणेकरून जास्तीत जास्त कूलिंग क्षमता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होईल. जास्तीत जास्त वापरादरम्यान एअर कंडिशनर चालू असताना खोलीत झाडणेसाफसफाई करणे टाळा.  फिल्टरमध्ये धूळ किंवा फायबर अडकलेले नाही याची खात्री करून घेण्यासाठी फिल्टरची आठवड्यातून एकदा तपासणी केली पाहिजे. फिल्टर साफ करणे सोपे आहे आणि तुम्हाला मदत आणि मार्गदर्शकरण्यासाठी येथे एक सोपा व्हिडिओ दिला आहे:

https://www.youtube.com/watch?v=40tLimZW7zY

·         एअर कंडिशनरच्या बाहेरील युनिटचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ असल्याची खात्री करा आणि त्यावर कोणतीही घाण साचू देऊ नका. धूळ आणि घाण हवेचा प्रवाह अवरोधित करतात आणि आपल्या एसीच्या यंत्रणेला अधिक कठोर परिश्रम करण्यास भाग पाडतात. त्यामुळे एसीच्या कार्यक्षमतेला हानी पोहोचवताना त्यांची टिकाऊक्षमता कमी होते.

·         गारवा आणि उर्जेची बचत यांच्या योग्य संतुलनासाठी तुमच्या आरामाच्या आधारावर तुमचे एअर कंडिशनर २४-२६ डिग्री सेल्सिअसच्या आदर्श तापमानात ठेवा. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की २२ °C च्या वर ठेवलेल्या प्रत्येक डिग्री तापनासाठी तुम्ही ३-५% पर्यंत कमी ऊर्जा वापरू शकता.

·         रात्री स्लीप/टाइमर फंक्शन वापरण्याची शिफारस केली जाते.

·         थंड हवा समान रीतीने पसरवण्यासाठी आणि गरम हवा खाली ढकलण्यासाठी अधूनमधून सीलिंग फॅन वापराअशा प्रकारे एअर कंडिशनरच्या बाहेरील युनिटला कमी दाब पडेल आणि कूलिंगचे काम अधिक कार्यक्षमपणे होईल.

·         जाड कापड किंवा ब्लॅकआउट पडदे वापरून सूर्यप्रकाश रोखा. यामुळे थेट सूर्यकिरण दूर ठेवण्यास मदत होईल आणि नैसर्गिकरित्या खोली विशेषतः दुपारच्या वेळी किंचित गारवा राहील.

·         खिडक्या किंवा दार उघडे ठेवून एअर कंडिशनर चालवू नका. खोलीची दारेखिडक्या इ.गोष्टी एसी सुरु असताना योग्यप्रकारे बंदच पाहिजेत.

·         सर्वात शेवटी महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा. आर २९० किंवा आर ३२ सारखे इको-फ्रेंडली रेफ्रिजरंट वापरणारे पर्यावरणपूरक एसी वापरा. ते शून्य ओझोन कमी करतात आणि जागतिक तापमानवाढ करण्याची त्यांची कमी क्षमता असते.

तर मग चलातुमच्या एसीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आणि कडक उन्हाळ्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..