युनियन बँक ऑफ इंडिया


युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने मुंबईत डिजीटल कॉंक्लेव्ह

मुंबई, 06 एप्रिल, 2022: युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने आज यशवंतराव चव्हाण केंद्रमुंबई येथे पहिल्या डिजीटल कॉंक्लेव्हचे आयोजन करण्यात आले. बँकेत डिजीटल बँक निर्माण करण्याच्या दिशेने हा प्रयत्न आहे.

या बैठक (कॉंक्लेव्ह)दरम्यान एमडी आणि सीईओ श्री राजकिरण राय यांनी ‘युनियन संभव – वर्ल्ड ऑफ अपॉर्च्युनिटीज’ या भविष्यातील डिजीटल सिद्धतेसाठी परिवर्तन प्रकल्पासह आगामी सुपर ॲप UNIONNXT – Do it Yourself (युनियन नेक्स्ट – डू इट युअरसेल्फ) चे उदघाटन केले. या डिजीटल उपक्रमाचा मुख्य भर हा प्रगत पद्धतीनेप्रामुख्याने डू इट युअरसेल्फ (स्वयंसिद्धता) उद्देशाने सर्व प्रकारच्या बँकिंगसाठी ग्राहकांचे सक्षमीकरण करणे आहे.

ग्राहक अनुभवासह प्राथमिक उद्देश (डिझाईन थिंकिंग)च्या स्वरुपात पाच ग्राहककेंद्री डिजीटल अर्थसाह्य (सर्वसमावेशक एसटीपी) प्रवास जसे की, पूर्व-संमत वैयक्तिक कर्ज (पीएपीएल)युनियन कॅश (निवृत्तीधारकांसाठी कर्ज)शिशू मुद्रा लोनएमएसएमई लोन-ऑटो-रिन्यूअल, केसीसी लोन-ऑटो-रिन्यूअलचे उद्घाटन डिजीटल कॉंक्लेव्ह दरम्यान झाले. बँकेच्या मोबाईल बँकिंगवर नवीन डेटा-आधारित आकर्षक उत्पादने आणि सेवांचा समावेश आहे. या कार्यक्रमात सॉफ्ट-पीओएस आणि सीआरएम ॲप्लिकेशनची सुरुवात करण्यात आली.

या डिजीटल प्रवासांचे विशेष आकर्षण मोबाईल फर्स्टग्राहक-केंद्री, वृद्धिंगत कामकाजी क्षमताकार्यवाहीसाठी कमी वेळकिमान क्लिक्सशून्य शाखा भेटी इत्यादी आहेत.

या सोहळ्यात बँकेच्या आगामी डिजीटल प्रकल्पांचे सादरीकरण देखील करण्यात आलेहे प्रकल्प अंतीम अंमलबजावणीकरिता विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत. यामध्ये डिजीटल सक्षमीकरणात विमाम्युच्युअल फंडगोदामांसाठी अर्थसाह्यजीएसटी रोख-तरलता आधारित कर्जसुविधा, तरूण आणि किशोर मुद्रा लोन, सह-कर्ज तसेच पूल बाय-आऊट, गृह कर्ज आणि शैक्षणिक कर्जांचा समावेश आहे.

याप्रसंगी बोलताना युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ श्री राजकिरण राय म्हणाले, “प्रोजेक्ट ‘संभव – वर्ल्ड ऑफ अपॉर्च्युनिटीज’ आणि सुपर ॲप UNIONNXT – Do it Yourself (युनियन नेक्स्ट – डू इट युअरसेल्फ)सहयुनियन बँक ऑफ इंडिया डिजीटल परिवर्तनाला चालना देत ग्राहकांसाठी व्यावसायिक विचार आणि उद्योग आवश्यकतेसह अस्सल-वैश्विक मूल्य मिळवून देईलअसा मला विश्वास आहे.”  

वाढत्या डिजीटल व्यवसायाचा प्रमुख हिस्सा मिळवण्यासाठी आणि सशक्त डिजीटल वातावरण निर्मितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाचे डिजीटल कॉंक्लेव्ह एक महत्त्वाचे पाऊल ठरेल अशी बँकेला आशा आहे. केवळ एक वर्षापूर्वी युनियन बँक ऑफ इंडियाने सहजसुलभ डिजीटल अनुभव आणि चांगली ग्राहकसेवा देण्यासाठी डिजीटायजेशन विभागाची सुरुवात केली होती.

 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..