विराजसने घेतला मजेदार उखाणा
किचन कल्लाकारच्या मंचावर प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते. या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक सेलिब्रिटी जोडपं पाहायला मिळणार आहे.अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत आणि ते दोघे या किचनमध्ये एकत्र कल्ला करताना दिसतील. किचन कल्लाकारमध्ये पाककलेसोबतच धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळतेच. या भागात विराजासने एक मजेदार उखाणा घेतला. विराजास उखाण्यात असं म्हणाला, "किचन कल्लाकारच्या मंचावर करायचंय आम्हाला श्रीखंड, शिवानी सोबत आहेच आता घेऊ का हे भांड?" हा उखाणा ऐकून सगळ्यांना हसून हसून लोटपोट झाले. शिवानीने हा उखाणा ऐकताना तिच्या पोटात गोळा आला असं म्हंटल. आता हे दोघे मिळून पदार्थ कसा बनवतील ते पाहणं औस्त्युकाच ठरेल. या दोघांसोबत या भागात रेणुका शहाणे आणि अभिनेता पुष्कराज चिरपुटकर देखील दिसतीलकोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार
आषाढी एकादशीला वारक-यांसाठी आगळंवेगळं ‘ विठ्ठल दर्शन ’..! विठ्ठल भक्तांचा श्वास आणि ध्यास असणारी पंढरीची पायी वारी कोरोनामुळे यावर्षी थांबवावी लागली. विठ्ठला,जीवात जीव असेपर्यंत दरवर्षी पायी वारी करत तुझ्या दर्शनाला येईन असा विठ्ठलाला शब्द दिलेल्या वारकऱ्यांच्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. या आषाढीला चंद्रभागेच्या तीरी झेंडा पताका फडकणार नाहीत, हरिनामाचा जयघोष होणार नाही, रिंगण होणार नाही, वारकऱ्यांना विठू माऊलीचं दर्शन घेता येणार नाही. याची देही याची डोळा विठ्ठलरूप मनात साठवता येणार नाही. धांवोनियां आलो पहावया मुख । गेले माझे दुःख जन्मांतरिंचे ॥ ऐकिले ही होते तैसे चि पाहिले । मन स्थिरावले तुझ्या पायी॥ तासनतास दर्शन रांगेत उभं राहून माऊलीचं दर्शन घेऊन मुक्ती अनुभवणारे आपले वारकरी. यावर्षी मात्र विठ्ठलाच्या वारकऱ्यांसाठीची आनंदाची पर्वणी अर्थात वारी आळंदीहून निघाली नाही. विठ्ठल भेटीची आस लागलेल्या तमाम विठ्ठल भक्तांसाठी काही करता येईल का असा विचार करत आषाढी एकादशी दिवशी लाखो वारकऱ्यांसाठी सचिन बाळासाहेब सुर्यवंशी यांचं लिखाण असलेलं विठ्ठलाचं एक आगळंवेगळं 'दर्शन' अभिनेते
Comments
Post a Comment