व्ही-ट्रान्स (इंडिया) लिमिटेड


व्ही-ट्रान्स (इंडियालिमिटेडचा प्रतिष्ठीत इंडिया कार्गो ॲवॉर्डसच्या वतीने “बेस्ट इंटीग्रेटेड लॉजिस्टीक्स सर्विस प्रोव्हायडर” म्हणून गौरव   

लॉजिस्टीक्स आणि कार्गो उद्योगातील यशासाठी जबाबदार असलेल्यांच्या कामगिरीची दखल घेणारे प्रतिष्ठीत पुरवठा साखळी पुरस्कार

मुंबई, 06 एप्रिल, 2022 – व्ही-ट्रान्स (इंडियालिमिटेडया पसंतीच्या सिंगल विंडो लॉजिस्टीक्स सोल्यूशन प्रोव्हायडरचा “बेस्ट इंटीग्रेटेड लॉजिस्टीक्स सर्विस प्रोव्हायडर” म्हणून मानाच्या समजल्या जाणाऱ्या इंडिया कार्गो ॲवॉर्डसने सन्मानित करण्यात आले. हा भारताचा पुरवठा साखळी पुरस्कारातील सर्वोश्रेष्ठ सन्मान असून या विशेष मंचाद्वारे कार्गो आणि लॉजिस्टीक्स क्षेत्रात मिळवलेल्या यशाची दखल 30 मार्च 2022 रोजी पुरस्कार प्रदान करून घेण्यात आली.

व्ही-ट्रान्स (इंडिया) लिमिटेडचे एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर श्री. आदित्य शहा यांनी क्राऊन प्लाझानवी दिल्ली येथे श्री. अमृतलाल मीनाआयएएसविशेष सचिव (लॉजिस्टीक) - वाणिज्य विभागभारत सरकार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

व्ही-ट्रान्स (इंडियाहा संपूर्ण भारतात पृष्ठभागावरून होणाऱ्या वाहतुकीत सर्वोत्तम मानला जातो. सार्कमध्ये व्ही-एक्सप्रेस हा घरपोच सेवा पोहोचवणारामल्टीनोडल एक्सप्रेस कार्गो मूव्हमेंटमधील एक्सपर्ट आहेव्ही-लॉजिस सर्वसमावेशक गोदाम आणि सर्वसमावेशक एकीकृत लॉजिस्टीक उपलब्ध करून देतो. एक जोड-व्यवसाय म्हणून सर्वोत्तम पायाभूत सुविधेसह 850 पेक्षा अधिक शाखांत देशभर अस्तित्व राखून आहे. त्यांची पायाभूत सुविधा पूर्णपणे स्वयंचलित असून डब्ल्यूएमएसमधील व्हर्च्युअल मॅपिंग वेअरहाऊस जास्तीत जास्त जागेचा वापर आणि इन्वेंटरी कंट्रोल प्रदान करते. त्याचे हब अँड स्पोक मॉडेलची मांडणी सुयोग्य असून वर्षाला 22 लाख टनपेक्षा जास्त आकारमान विविध उद्योग आणि निरनिराळ्या ठिकाणांहून हलविण्यात येते. 

 

व्ही-ट्रान्सचे बाजारातील नेतृत्व अनेक पुरस्कार आणि ग्राहक मान्यता मिळवत बराच अद्ययावत आणि वैध ठरला आहे. या कंपनीने इंडिया कार्गो ॲवॉर्डसतर्फे देण्यात येणारा ‘बेस्ट इंटीग्रेटेड लॉजिस्टीक्स सर्विस प्रोव्हायडर 2022’ पटकावलाटीम मार्क्समॅन अँड सीएनबीसीच्या वतीने मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड 2020इकनॉमिक टाईम्सच्या वतीने देण्यात येणारा आयकॉनिक ब्रँड ऑफ इंडिया 2020सीआयआयतर्फे देण्यात येणारा ओव्हरऑल सप्लाय चेन एक्सलन्स – स्केल ॲवॉडस् सलग तीन वर्षांसाठीआयसीसी – सप्लाय् चेन लॉजिस्टीक्स समिट अँड एक्सलन्स ॲवॉर्डमध्ये बऱ्याचदा ‘बेस्ट रोड ट्रान्सपोर्ट कंपनी ऑफ इंडिया’आणि प्रतिष्ठीत सीएफबीपी जमनालाल बजाज उचित व्यवहार पुरस्कार (व्ही-ट्रान्स दोनदा अद्वितीय विजेता) असे अनेक सन्मान पटकावले आहेत.

या दखलपात्र कामगिरीविषयी बोलताना व्ही-ट्रान्स (इंडिया) लिमिटेडचे समूह व्यवस्थापकीय संचालक महेंद्र शाह म्हणाले की, “इंडिया कार्गो ॲवॉर्डस्‘च्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘बेस्ट इंटीग्रेटेड लॉजिस्टीक्स सर्विस प्रोव्हायडर’ पुरस्कार प्राप्त करून फार आनंद वाटतो आहे. आमच्या कंपनी संस्कृतीचा भाग म्हणून व्ही-ट्रान्समध्ये विश्वासार्ह एकीकृत लॉजिस्टीक उत्पादन पर्यायांची वचनबद्धता जपली आहे. हा पुरस्कार सुरक्षा, विश्वासटीमवर्कसर्वोत्तमता आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे. आपल्या ग्राहकांच्या व्यवसायविषयक समस्या सोडवण्याचे आमचे लक्ष्य आहे आणि लॉजिस्टीक क्षेत्रातील महामेरू होण्याची महत्त्वाकांक्षा आहे.”

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..