किचन कल्लाकारच्या मंचावर राजकीय धुरळा

 किचन कल्लाकारच्या मंचावर राजनीतिक मेजवानी

झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते. या आठवड्यात कलाकार नाही तर काही सुप्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्व किचन कल्लाकारच्या सेटवर पाहायला मिळतील. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि त्यांच्यासोबत राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या नेत्या चित्राताई वाघ आणि रुपालीताई ठोंबरे यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावली. या तिघींना महाराजांसाठी चविष्ट पदार्थ बनवणं काही सोपं नव्हतं कारण त्यांना जेवण बनवतानाच एक मोठं आव्हान दिलं होतं. या तिघींना देखील भाजीची टोकरी हातात किंवा कडेवर घेऊन पदार्थ बनवायला सांगण्यात आले. त्यामुळे कोण हे आव्हान लीलया पेलवणार हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल. इतकंच नव्हे तर किशोरीताईंसाठी एक खास सरप्राईज देखील या भागात देण्यात आलं. त्यामुळे हा भाग पाहायला विसरू नका बुधवारी रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO