मराठी कलाकारांनी दिमाखात साजरा केला चिरायू २०२२

करोना काळातल्या वाईट आठवणी बाजूला सारत नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी मराठी सृष्टी 'चिरायू २०२२'च्या निमित्ताने दोन वर्षांनी एकत्र जमली होती. उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात हा सोहळा दिमाखात रंगला. या  सोहळयाला मा. किशोरीताई पेडणेकरआमदार सुनील शिंदेरमेश लटके प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर आदि अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी बोलताना ‘चिरायूचे सुशांत शेलार यांनी सांगितले की, ‘नव्या उमेदीने आम्ही नववर्षाची सुरुवात करीत असून मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अधिकाधिक आनंद देण्याचा आम्हा कलावंतांचा प्रयत्न असणार आहे’. 

शेलार मामा फाऊंडेशन’ आणि प्लॅनेट मराठीच्या वतीने आयोजित या चिरायू २०२२ चे वैशिष्ट्य म्हणजे नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या अनेक कलाकर्मींची दखल चिरायू’ च्या मंचावर आवर्जून घेतली गेली. मराठी कलाप्रांतात आपले भरीव योगदान देणाऱ्या पडद्यामागच्या कलाकर्मींचा सन्मान चिरायूतर्फे यावेळी करण्यात आला. रंगमंच कामगार संघटनेचे प्रवक्ते रत्नकांत जगताप, सुमित गाडेमेकअपदादा प्रभाकर बारसे, कलादिग्दर्शक सुमित पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी विष्णू जाधव, मराठी चित्रपट महामंडळात काम करणाऱ्या लक्ष्मी परब या रंगकर्मींचा सन्मान यावेळी किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

सुमन एंटरटेनमेंटचे केदार जोशी, वीणा ग्रुप प्रोपर्टीचे करण नाईक, मुंबई बीट्स स्टुडिओ प्रोड्क्शनचे अर्जुन मुद्दा, नील ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपरचे विलास कोठारी, 11 क्रिकेट पंडितचे अॅड.साजन पाटील आदि मान्यवर या सोहळयासाठी आवर्जून उपस्थित होते. नाटय सिनेसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ यासोबतच अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य या सोहळयासाठी लाभले. आगामी ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील कलाकारांनीही या सोहळयासाठी विशेष हजेरी लावली होती.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..