शेर शिवराज’ चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्समध्ये प्रदर्शित

शेर शिवराज च्या शिरपेचात आणखी एक बहुमान

आज आपण तंत्रज्ञान क्रांतीच्या अशा उंबरठयावर आहोत की ज्यात कोणतीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून मेटाव्हर्स’ नावाच्या संकल्पनेने आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका आभासी तंत्रज्ञानाद्वारे ओळख तयार करुन त्याद्वारे संवाद साधण्याचे माध्यम म्हणून मेटाव्हर्सकडे पाहिले जाते. वेब ३.० हे नव्याने आलेले इंटरनेटचे युग आहे. वेब ३.० मध्ये फाइव्ह जीब्लॉकचेनऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटीव्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे तंत्रज्ञानदेखील थेट मेटाव्हर्सशी निगडितच आहे. वेब ३.० मध्ये वापरकर्ते कोणत्याही मध्यस्थ व्यक्तीशिवाय विविध सोयी-सुविधांचा थेट लाभ घेऊ शकतात.

मनोरंजनाचा हा नवा ट्रेण्ड प्रत्येकालाच आकर्षित करतो आहे. अशाप्रकारे हे नवे तंत्रज्ञान मानवी आयुष्याशी संबंधित सर्व क्षेत्रांना व्यापून उरणार आहे. आगामी शेर शिवराज या ऐतिहसिक मराठी चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्सच्या माध्यमातून दाखविला गेला. मेटाव्हर्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखविण्यात आलेला हा पहिलाच मराठी चित्रपटाचा ट्रेलर आहे. मुंबई मुवी स्टूडियोज आणि यूएफओ मुव्हीज यांनी शेर शिवराज या मराठी चित्रपटाकरिता मेटावूडसोबत भागीदारी केली आहे. तंत्रज्ञानाशी सांगड घालत आपला दैदिप्यमान इतिहास भविष्यातील पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न आहे.

या तंत्रज्ञानाद्वारे ट्रेलर प्रदर्शित करण्याचा बहुमान शेर शिवराज चित्रपटाने मिळवला असून आमच्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब असल्याचे लेखक –दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, अभिनेते चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, अभिनेत्री माधवी निमकर, निर्माते नितीन केणी यांनी यावेळी सांगितले. हे तंत्रज्ञान भविष्यात माणसांचे आयुष्य बदलून टाकेल असा विश्वास निर्माते नितीन केणी यांनी व्यक्त केला.

एनएफटी या टेक्नोलॉजीद्वारे या चित्रपटाच्या आठवणी डिजीटली संग्रहित होणार आहे. NFT चा अर्थ Non Fungible Token ही एकप्रकारची डिजीटल संपत्ती आहे. याला ब्लॉकचेन टेक्नोलॉजीद्वारे हाताळले जाते. या टेक्नोलॉजीच्या मदतीने जीआयएफफोटोव्हिडिओ क्लिप्सपेटिंग डिजीटल संपत्तीची मालकी निश्चित होते.

आजची तरुणपिढी ही खूप टेक्नोसॅव्ही आहेतंत्रज्ञानातील बदलानुसार आपणही बदलत राहायला हवे याची त्यांना जाणीव आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतिहासाचे प्रत्येक पैलू उलगडण्याचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे.

Link - https://metawood.life/metaverse 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight