फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड

फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड ‘ची प्रस्तावित इनिशियल पब्लिक ऑफर

·         किंमत पट्टा प्रत्येकी  10 दर्शनी मूल्याचे  560 –  577 प्रती इक्विटी समभाग (“इक्विटी शेअर”).

·         बोली/प्रस्ताव खुला होण्याची दिनांक  – शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 आणि बोली/प्रस्ताव बंद होण्याची दिनांक  – मंगळवार, 02 नोव्हेंबर 2021.

·         किमान बोली गठ्ठा 25 इक्विटी समभाग आणि त्यानंतर  25 इक्विटी समभागांच्या पटीत.

·         फ्लोअर प्राईज ही इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 56 पटीत आणि भांडवली किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 57.7 पटीत.

 

मुंबई, 26 ऑक्टोबर, 2021: फिनो पेमेंट बँक लिमिटेड (“कंपनी”) आवश्यक मंजुरी, बाजार स्थिती आणि अन्य संमतीअधीन असून इक्विटी समभागाचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (“ऑफर”) शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 रोजी खुला होणार असून मंगळवार, 02 नोव्हेंबर 2021 रोजी बंद होणार आहे. या प्रस्तावाकरिता प्रती इक्विटी समभाग  560 –  577 ची ऑफर निश्चित करण्यात आली आहे.

या ऑफरमध्ये  3,000 दशलक्ष इक्विटी शेअरचा ताजा इश्यू समाविष्ट राहील आणि फिनो पेटेक (“प्रवर्तक विक्रेता समभागधारक”) यांच्या वतीने 15,602,999 इक्विटी शेअरची ऑफर फॉर सेल आहे.

या ताज्या इश्यूच्या व्यवहारातून जमा होणाऱ्या रकमेचा विनियोग बँकेच्या टीयर-1 भांडवली पाया स्थापनेकरीता करण्यात येईल.

फिनो पेमेंट्स बँक ही फिनो पेटेक लिमिटेड (एफपीएल) च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी असून प्राथमिक स्वरुपात वित्तीय सर्वसमावेशकते संबंधी तंत्रज्ञान-आधारीत पर्याय आणि सेवा उपलब्ध करून देण्यात कार्यरत आहे. एफपीएल ‘ला ब्लॅकस्टोन, आयसीआयसीआय ग्रुप, इंटेल कॅपिटल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, एचएव्ही3 होल्डिंग्ज (मॉरीशस) लिमिटेड आणि वर्ल्ड बँक आर्म इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) सारख्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकदारांचे पाठबळ आहे.

एक्सिस कॅपिटल लिमिटेड, सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे प्रस्तावचे बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”)आहेत.

कंपनी आणि विक्रेता समभागधारक यांनी प्रस्तावाकरिता बुक रनिंग लीड मॅनेजरचा सल्ला घेतला असून सेबी आयसीडीआर नियामकांसमवेत पायाभूत गुंतवणुकदारांचा सहभाग लक्षात घेण्यात आला, त्यांचा सहभाग बोली/ऑफर खुली होण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे गुरुवार, 28 ऑक्टोबर 2021 रोजी ग्राह्य धरण्यात येईल. हा प्रस्ताव सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्स 1957 चा नियम 19(2)(b) सुधारणेनुसार खुला करण्यात आला आहे, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्ससह वाचा. हा प्रस्ताव बुक बिल्डींग प्रोसेसच्या माध्यमातून सेबी आयसीडीआर रेग्युलेशनच्या रेग्युलेशन 6 (2) अनुपालनानुसार असेल, ज्यामध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांकरिता प्रस्तावाच्या 75% हून कमी हिस्सा नसेल आणि 15% अधिक प्रस्ताव बिगर-संस्थात्मक बोलीधारकांकरिता उपलब्ध राहील, त्याचप्रमाणे प्रस्तावाच्या 10% पेक्षा अधिक हिस्सा रिटेल वैयक्तिक बोलीकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight