पेटीएम पेमेण्‍ट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल)

पेटीएम पेमेण्‍ट्स बँकेकडून 'पेटीएम ट्रान्झिट कार्ड' लाँच – भारतीय युजर्स आता एका कार्डसह मेट्रो, बस व रेल्‍वे प्रवास, पार्किंग, ऑनलाइन व ऑफलाइन स्‍टोअर्समध्‍ये पेमेण्‍ट्स या सर्वांसाठी देय भरू शकतात

  • एनसीएमसी इंटर-ऑपरेबल फिजिकल मोबिलिटी कार्डची सुविधा, जे शासनाच्‍या 'वन नेशन, वन कार्ड' उपक्रमाला चालना देत लाखो भारतीय युजर्सना सोयीसुविधा देते
  • फास्‍टटॅग विभागामध्‍ये अग्रणी स्‍थान स्‍थापित
  • पेटीएम वॉलेटशी लिंक असलेले हे कार्ड मेट्रो, बसेस व रेल्‍वेमधील प्रवास, टोल व पार्किंग शुल्‍क भरणे, ऑफलाइन व ऑनलाइन स्‍टोअर्समध्‍ये पेमेण्‍ट आणि एटीएममधून पैसे काढणे अशा युजरच्‍या सर्व व्‍यवहारांसाठी वापरता येऊ शकते
  • युजर्स कार्ड वापरण्‍यासाठी पेटीएम वॉलेट अकाऊंट टॉप अप करू शकतात आणि त्‍यासाठी कोणतेही वेगळे अकाऊंट निर्माण करण्‍याची गरज नाही
  • लाँचचा पहिला टप्‍पा हैदराबाद मेट्रो रेल, अहमदाबाद मेट्रो आणि दिल्‍ली एअरपोर्ट एक्‍स्‍प्रेस लाइन सोबत सहयोगाने लाँच करण्‍यात आला आहे, जेथे युजर्स एकसंधी व्‍यवहारांच्‍या क्षमतेचा लाभ घेऊ शकतात

मुंबई : पेटीएम पेमेण्‍ट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) या भारताच्‍या स्‍वदेशी पेमेण्‍ट्स बँकेने आज पेटीएम ट्रान्झिट कार्डच्‍या लाँचची घोषणा केली. असे करत बँकेने 'वन नेशन, वन कार्ड' या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. बँकेचा लाखो भारतीय युजर्सना मेट्रो, रेल्‍वे, सरकारी मालकीच्‍या बससेवेमधील प्रवास, टोल व पार्किंग शुल्‍क, ऑफलाइन मर्चंट स्‍टोअर्सना पेमेण्‍ट्स, ऑनलाइन शॉपिंग अशा त्‍यांच्‍या दैनंदिन गरजांसाठी एकाच फिजिकल कार्डची सुविधा देण्‍याचा मनसुबा आहे. या कार्डच्‍या माध्‍यमातून एटीएममधून पैसे देखील काढता येतात. या लाँचसह युजर्सना विभिन्‍न उद्देशांसाठी अनेक कार्डस् सोबत ठेवण्‍याची गरज भासणार नाही. ते त्‍यांच्‍या सर्व पेमेण्‍ट्ससाठी पेटीएम ट्रान्झिट कार्ड वापरू शकतात.

ट्रान्झिट कार्डचे लाँच सर्व भारतीयांसाठी बँकिंग व व्‍यवहार एकसंधीपणे कार्यक्षम बनवणारी उत्‍पादने सादर करणा-या बँकेच्‍या उपक्रमांशी संलग्‍न आहे. बँकेचे प्रबळ तंत्रज्ञान व व्‍यापक युजरवर्गासह पीपीबीएल 'पेटीएम ट्रान्झिट कार्ड'च्‍या मोठ्या प्रमाणात अवलंबतेला चालना देईल, ज्‍यामुळे एनसीएमसी व डिजिटल भारत उपक्रमाला अधिक चालना मिळण्‍यास मदत होईल.

तसेच या कार्डने पेटीएम ॲपवरील कार्डसच्‍या व्‍यवहारांसाठी अर्जरिचार्ज करण्‍याकरिता व त्‍यावर देखरेख ठेवण्‍याकरिता पूर्णत: डिजिटल प्रक्रिया देखील तयार केली आहे. हे फिजिकल कार्ड युजरला घरपोच डिलिव्‍हर केले जाईल किंवा नियुक्‍त सेल्‍स पॉइण्‍ट्सवर खरेदी करता येऊ शकते. प्रीपेड कार्ड थेट पेटीएम वॉलेटशी लिंक आहे, जेथे युजर्स ट्रान्झिट कार्डचा वापर करण्‍यासाठी वॉलेट टॉप-अप करू शकतात आणि त्‍यासाठी कोणतेही वेगळे अकाऊंट तयार करण्‍याची गरज नाही. 

पेटीएम ट्रान्झिट कार्ड हैदराबाद मेट्रो रेलसोबत सहयोगाने लाँच करण्‍यात आले आहे. हैदराबादमधील युजर्स आता सुलभपणे ट्रान्झिट कार्ड खरेदी करू शकतात, जे प्रवासासाठी ऑटोमॅटिक फेअर कलेक्‍शन (एएफसी) येथे दाखवता येऊ शकते. ही सेवा दररोज मेट्रो/बस/ट्रेन सर्वि‍सेसचा वापर करणा-या ५० लाखांहून अधिक राइडर्सना मदत करेल आणि त्‍यांना एकसंधी कनेक्‍टीव्‍हीटीचा अनुभव मिळेल. दिल्‍ली एअरपोर्ट एक्‍स्‍प्रेस लाइन व अहमदाबाद मेट्रो येथे या कार्डचा वापर यापूर्वीच सुरू झाला आहे. पेटीएम ट्रान्झिट कार्डसह लोक एकच कार्ड मेट्रोमध्‍ये, तसेच देशभरातील इतर मेट्रो स्‍टेशन्‍समध्‍ये देखील वापरू शकतात.

पेटीएम पेमेण्‍ट्स बँक लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सतिश गुप्‍ता म्‍हणाले, ''पेटीएम ट्रान्झिट कार्डचे लाँच लाखो भारतीय युजर्सना एकाच कार्डसह सक्षम करेल. हे कार्ड सर्व परिवहन, तसेच बँकिंग गरजांची काळजी घेते. यामुळे सर्वांसाठी आर्थिक समावेशन व उपलब्‍धतेला चालना मिळेल. आम्‍हाला एनसीएमसी उपक्रमाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही देशातील ट्रान्झिट इकोप्रणालीच्‍या डिजिटायझेशनप्रती काम करणे सुरूच ठेवण्‍यासोबत स्‍मार्ट मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सच्‍या अवलंबतेला चालना देऊ.''

पेटीएम ट्रान्झिट कार्ड हे पीपीबीएल फास्‍टॅग्‍सच्‍या यशानंतर मास ट्रान्झिट विभागामधील बँकेचे दुसरे उत्‍पादन आहे. पेटीएम पेमेण्‍ट्स बँक ही १ कोटीहून अधिक फास्‍टटॅग्‍स जारी करण्‍याचा सुवर्ण टप्‍पा गाठणारी देशातील पहिली बँक आहे. याव्‍यतिरिक्‍त ही बँक इंटरऑपरेबल देशव्‍यापी टोल पेमेण्‍ट सोल्‍यूशन देणा-या नॅशनल इलेक्‍ट्रॉनिक टोल कलेक्‍शन (एनईटीसी) साठी टोल प्‍लाझांची भारताची सर्वात मोठी अधिग्रहणकर्ता देखील आहे. बँकेने डिजिटली टोल शुल्‍क गोळा करण्‍यासाठी राष्‍ट्रीय व राज्‍य महामार्गांवर २८० हून अधिक टोल प्‍लाझांची सुविधा दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight