लुईस फिलिपकडून आकर्षक 'रॉयल इंडियन वेडिंग' कलेक्‍शन लाँच

लुईस फिलिपकडून आकर्षक 'रॉयल इंडियन वेडिंगकलेक्‍शन लाँच 

प्रत्‍येक प्रसंगासाठी डिझाइन केलेले प्रिमिअम पोशाख

मुंबईफेब्रुवारी २०२०२४: लुईस फिलिप या आदित्‍य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्‍या भारतातील आघाडीच्‍या प्रिमिअम मेन्‍सवेअर ब्रॅण्‍डला त्‍यांची नवीन ऑफरिंग भव्‍यता व लक्‍झरीचे सेलिब्रेशन 'रॉयल इंडियन वेडिंगकलेक्‍शन लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. ही विशेष श्रेणी प्रत्‍येक नवरदेवाला त्‍याच्‍या जीवनातील खास दिवशी राजेशाहीचा अनुभव देण्‍यासाठी सुरेखरित्‍या डिझाइन करण्‍यात आली आहेतजी कालातीत अभिजातपणा आणि समकालीन आकर्षकतेचे प्रतीक आहे.

लुईस फिलिपचे 'रॉयल इंडियन वेडिंगकलेक्‍शन प्री-वेडिंग फोटोशूट्सपासून रिसेप्‍शन समारोहापर्यंत विवाह सोहळ्याच्‍या प्रवासामधील प्रत्‍येक महत्त्वपूर्ण प्रसंगाची पूर्तता करते. आकर्षक थ्री-पीस सूट्सआकर्षक बंदीचमकदार बंधगला आणि ग्‍लॅम टक्सिडो असलेले प्रत्‍येक पोशाख विशेष स्‍टायलिश लेपल्‍ससह गडद काळ्या रंगामध्‍ये डिझाइन करण्‍यात आले आहेतसेच सॅटिन शर्टससह कन्‍सील पॅकेट्स आणि बीज्‍वेल कॉलर्स आहेत. सर्वोत्तम कच्‍च्या साहित्‍यापासून डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या कलेक्‍शनमध्‍ये वैविध्‍यपूर्ण कलर पॅलेटसह भव्य ज्‍वेल टोन्‍स जसे ब्‍ल्‍यूमरूनवाइन व टील यासोबत आकर्षक रंगसंगती जसे क्रीम व क्‍वॉर्टझ पिंक यांचा समावेश आहेजे कोणत्‍याही प्रसंगामध्‍ये शाही मोहकतेची भर करतात. 

लुईस फिलिपच्‍या सीओओ फरिदा कलियादान म्हणाल्‍या, ''सर्वजण विवाह सीझनचा आनंद घेण्‍यास सज्ज असताना आम्‍हाला आमचे 'रॉयल इंडियन वेडिंगकलेक्‍शन लाँच करण्‍याचा आनंद होत आहेजे नवरदेवाला त्‍याच्‍या जीवनातील खास दिवशी अस्‍सल शाही अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. प्रत्‍येक पोशाख राजेशाही अनुभव मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आला आहे. या कलेक्‍शनसह लुईस फिलिपने विवाह पोशाखांच्‍या खरेदीसाठी पसंतीचा ब्रॅण्‍ड म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ केले आहे. हे कलेक्‍शन अद्वितीय दर्जा व डिझाइन देते.''

लुईस फिलिपच्‍या 'रॉयल इंडियन वेडिंगकलेक्‍शनला विशिष्ट ठरवणारी बाब म्‍हणजे सुपर-प्रिमिअम फॅब्रिक्‍सचा वापरज्‍यामध्‍ये आकर्षक सिल्‍क ब्‍लेण्‍ड्स व लक्‍झरीअस वेल्‍वेट्सपासून सर्वोत्तम वूलन टेक्‍स्‍टाइल्‍सचा समावेश आहे. बारीकसारीक गोष्‍टींमधून उत्तम कारागिरी दिसून येतेज्‍यामध्‍ये जॅक्वार्डस्हाताने केलेल्‍या भरतकामासह चमकदार असेंट्स, 'झरीकलाकृती आणि बारकाईने विणलेले मोती यांचा समावेश आहे. प्रत्‍येक पोशाखामधून अद्वितीय आकर्षकता व भव्‍यता दिसून येतेज्‍यामुळे लुईस फिलिप विवाह पोशाखाच्‍या खरेदीसाठी प्रमुख गंतव्य बनले आहे.

लुईस फिलिपचे 'रॉयल इंडियन वेडिंगकलेक्‍शन आता मुंबईतील 11 लुईस फिलिप फ्लॅगशिप स्‍टोअर्सअधिकृत रिटेलर्सऑनलाइन www.louisphilippe.com येथे आणि ब्रॅण्‍डच्‍या मोबाइल अॅपच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध आहे.  

लुईस फिलिपच्‍या रॉयल इंडियन वेडिंग कलेक्‍शनसह तुमच्‍या विवाह सोहळ्याला संस्‍मरणीय करा!

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight