आदित्‍य बिर्ला फॅशन आणि तरूण तहिलियानी...

आदित्‍य बिर्ला फॅशन आणि तरूण तहिलियानी यांनी मुंबईमध्‍ये  ५ व्‍या तस्‍वा स्‍टोअरच्‍या भव्‍य उद्घाटनासह भारतीय मेन्‍सवेअर स्‍तराला नेले नव्‍या उंचीवर

मुंबई, 22 फेब्रुवारी २०२४:- तस्‍वा हा आदित्‍य बिर्ला फॅशन अँड रिटेल लि.चा भारतीय मेन्‍सवेअर ब्रॅण्‍ड आणि सुप्रसिद्ध डिझाइनर तरूण तहिलियानी यांना मुंबईतील ऑबेरॉय मॉल येथे त्‍यांच्‍या ५ व्‍या स्‍टोअरच्‍या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे.

ऑबेरॉय मॉलगोरेगाव येथे धोरणात्‍मरित्‍या स्थित नवीन स्‍टोअर शहरातील व आसपासच्‍या भागांमधील सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करेलतसेच आपल्‍या नवीन पैलूसह बारकाईने डिझाइन करण्‍यात आलेल्या वेडिंग व प्रासंगिक पोशाखांची व्‍यापक श्रेणी प्रदान करेलज्‍यामध्‍ये आरामदायीपणा व स्‍टाइलचे सुरेख संयोजन आहे.

तस्‍वाचे मुंबईतील पाचवे स्‍टोअर ब्रॅण्‍डच्‍या प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहेज्‍यामधून ब्रॅण्‍डचा विकास आणि अद्वितीय फॅशन व जीवनशैली उत्‍पादने वितरित करण्‍याप्रती सातत्‍यपूर्ण कटिबद्धता दिसून येते. ब्रॅण्‍डचे नवीन स्‍टोअर १,७४६ चौरस फूट जागेवर पसरलेले आहे आणि कुर्तेबंदीशेरवानीबांधगलाआचकानचुरीदारअलिगढी आणि ॲक्‍सेसरीज जसे साफाब्रोचेसपॉकेट स्क्वेअरशालस्टोलमोजरी यांची श्रेणी प्रदान करते. स्‍टोअरमधील उत्‍साहवर्धक वातावरण अनोख्‍या कलेक्‍शनला पूरक आहे. तस्‍वाची माहितीपूर्ण स्‍टायलिस्‍ट्सची टीम ग्राहकांच्‍या अद्वितीय पसंतींना समजून घेण्‍याप्रती आणि वैयक्तिकृत साह्य प्रदान करण्‍याप्रती समर्पित आहे. 

प्रत्‍येक गारमेंटमधून तरूण तहिलियानी यांची सिग्‍नेचर स्‍टाइल दिसून येतेजे तस्‍वा आऊटफिट डिझाइन करण्‍यासाठी बारीक-सारीक गोष्‍टींवर लक्ष देत कुशलपणे तयार करण्‍यात आले आहे. तस्‍वा रेशीमबनारसी ब्रोकेडमखमली व कॉटन अशा कापडांचा वापर करतेज्‍यामधून भारतीय टेक्‍सटाइल्सचा संपन्‍न वारसा साजरा केला जातो. पारंपारिक भरतकाम जसे जरदोजीआरीचिकनकारी आणि गोटा वर्कचा संपूर्ण कलेक्‍शनमध्‍ये मोठ्या प्रमाणावर वापर करण्‍यात आला आहेज्‍यामध्‍ये जागतिक भारतीयांसाठी भारतीय कारागिरीच्‍या आकर्षकतेसह समकालीन सिल्‍हूट्सचा समावेश आहे. 

नवीन स्‍टोअरच्‍या उद्घाटनाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत तस्‍वाचे चीफ डिझाइन ऑफिसर तरूण तहिलियानी म्‍हणाले, ''तस्‍वा हे माझे दीर्घकालीन स्‍वप्‍न आहेजे आदित्‍य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्‍या माध्‍यमातून शक्‍य झाले. नावामधून या ब्रॅण्‍डचे सर्वोत्तम व्‍हर्जन दिसून देतेजेथे आम्‍ही ब्रॅण्‍डला परिपूर्ण लुक देण्‍यासाठी अथक मेहनत घेतली आहे. दीर्घकाळापासून मी ऐकले आहे की, एथनिक वेअर कम्फर्टेबल नसतात आणि तस्‍वा या समस्‍येचे निराकरण करण्‍यासाठी आमचा प्रयत्‍न आहे. आम्‍ही गारमेंट्स डिझाइन केले आहेतजे आमच्‍या ग्राहकांनाइंडियन मॅनला आंतरराष्‍ट्रीय दर्जानुसार बनवण्‍यात आलेल्‍या आकर्षक आऊटफिट्सचा अनुभव देतात.''

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत तस्‍वाचे ब्रॅण्‍ड प्रमुख आशिष मुकुल म्‍हणाले, ''तस्‍वाने आपल्‍या दर्जात्‍मक उत्‍पादन ऑफरिंगसोबत प्रबळ ग्राहक कनेक्‍शन आणि मेन्‍स इंडियन वेअर ग्राहकांसाठी अद्वितीय स्‍टोअर अनुभवाची निर्मिती केली आहे. भारतीय खास क्षणांसाठी परिपूर्ण उत्‍पादन ऑफरिंग आणि पुरूषांसाठी वेडिंग ॲपरल व ॲक्‍सेसरीजसह आमचा विश्‍वास आहे कीमुंबई सारखी प्रबळ बाजारपेठ आम्‍हाला या ब्रॅण्‍डला अधिकाधिक शॉपर्सपर्यंत घेऊन जाण्‍यास सक्षम करते.''

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight