बिझनेस स्वीडनचा भारतात विस्तार, मुंबईमध्ये सुरू केले नवीन कार्यालय..
बिझनेस स्वीडनचा भारतात विस्तार, मुंबईमध्ये सुरू केले नवीन कार्यालय (ऑफ़िस)
१८ मार्च २०२५ रोजी बिझनेस स्वीडनचा नवीन कार्यालयाचे उद्घाटन, मुंबई येथे स्वीडनचा परराष्ट्र मंत्री , मरिया माल्मर स्टेन्गार्ड आणि बिझनेस स्वीडनचे नवे सीईओ , श्री. जान लारसन यांचा हस्ते करण्यात आले.
बिझनेस स्वीडन, स्वीडिश ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्ट काऊन्सिल आपल्या भारतातील कार्यकारी विस्ताराकरिता मुंबई येथे आपले नवीन कार्यालय सुरू करते आहे. या धोरणात्मक हालचालींमुळे स्वीडिश शासनाचा आशीयामधील व्यापारी नात्यांवर भर देण्याचा उद्देश स्पष्ट होतो तसेच स्वीडन आणि भारतातील गुंतवणूक आणि व्यापार वाढावा म्हणून बिझनेस स्वीडनची बांधिलकी देखील दिसून येते.
२०३० सालापर्यंत भारत जगातील तीसरी सर्वात मोठी आर्थिक सत्ता बनणार हे लक्षात आल्यानंतर, स्वीडिश कंपन्या सातत्याने आपल्या बाजारपेठे कडे वळताना दिसून येतात.
“ भारत सातत्याने स्वीडिश कंपन्यांकरिता उत्तम व्यापारी वातावरण निर्माण करणाऱ्या पहिल्या तीन जागतीक बाजारपेठांपैकी एक राहिली आहे. यामुळे स्वीडिश एन्टरप्रायझेसकरिता जगातील सर्वात गजबजलेली बाजारपेठ म्हणून याचे महत्व अधोरेखीत होते. आमचे देशातील तीसरे कार्यालय सुरू करताना आम्ही आधीपासून भारतात असलेला आमचा ठसा अधिक पक्का करतो आहोत. यामुळे भारतीय आणि स्वीडिश व्यावसायिक समाजामध्ये एक महत्वाची माहिती पोहोचते की या दोन देशांमध्ये व्यापारासंबंधीत वाढती आणि भव्य क्षमता आहे.” असे बिझनेस स्वीडनचे सीईओ जान लार्सन म्हणाले.
“बिझनेस स्वीडनचा आधीपासूनच भारतात मजबूत असा ठसा उमटलेला असून त्यांचा तीसऱ्या कार्यालयाचा उद्घाटनाने त्यावर शिक्का मोर्तब केला आहे. यामुळे असे स्पष्ट संकेत मिळतात की भारतीय आणि स्वीडिश दोन्ही व्यापारी उद्योगपतींना दोन देशांमधील मजबूत आणि वाढती व्यापारी क्षमता हवी आहे.” असे बिझनेस स्वीडनचे सीईओ जान लार्सन म्हणाले.
आज सुमारे ३०० स्वीडिश कंपन्या भारतात कार्यरत असून, त्यांचे थेट २००,००० कर्मचारी आहेत तर २.२ दशलक्ष अप्रत्यक्ष कर्मचारी आहेत. यातील, १०० पेक्षा अधिक कंपन्या या माहाराष्ट्रातील पश्चिम भागात, तर गुजरात आणि गोवा येथे स्थित आहेत. याशिवाय आजपर्यंत ७० भारतीय कंपन्यांनी स्वीडनमध्ये गुंतवणूक करून थेट ७,००० नवीन रोजगार निर्माण केले आहेत.
“अगदी १९६० चा दशकापासून, महत्वाचे स्वीडिश उद्योग जसे एसकेएफ़, सॅन्डविक, टेट्रा पाक, अल्फ़ा लावल आणि ॲटलास कोप्को पुण्याचा आसपास स्थित आहेत, ज्यामुळे या भागातील स्वीडिश विकास आणि प्रगती ही अधिक प्रमाणात झालेली दिसून येते. आज टेक कंपन्यांचा बोलबाला आहे, जसे स्पॉटिफ़ाय, स्टोरीटेल, लेक्टस, गोमो आणि स्पोल्टो ज्यांचे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विस्तारीत होण्याचे नियोजन अगदी उत्तम गतीने सुरू आहे.” असे मुंबई येथील स्वीडिश काऊन्सिल जनरल स्वेन ओट्स्बर्ग यांनी सांगितले.
भारतात बिझनेस स्वीडनचा ट्रेड कमिशनर आणि कंट्री डिरेक्टर असलेल्या सोफ़िया हॉगमन, यांनी भारतातील बाजारपेठेमध्ये त्यांचा वाढत्या उत्सुकते बद्दल बोलताना सांगितले:
“भारतात सहाय्याची मागणी भरपूर आहे आणि आता आम्ही आरोग्यसेवा, इन्फ़्रास्ट्रक्चर, हरित क्रांती आणि उत्पादनक्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने स्वीडिश कंपन्यांना व्यावसायाचा संधी मिळाव्या म्हणून मदत करू शकतो. त्याच वेळेला, आम्ही भारतीय कंपन्यांना देखील स्वीडनमध्ये गुंतवणूक करून रोजगार निर्मीती करण्याकरिता मदत करू शकतो.
बिझनेस स्वीडनचे या पुर्वी दिल्ली आणि बेंगलूरू येथे कार्यलय होतेच. आता मुंबईमधील आणाखीन एका कार्यालयामुळे भारतातील आर्थिक राजधानीमध्ये बिझनेच स्वीडनचे पाय घट्ट रोवले जाणार आहेत तसेच पुण्यामधील स्वीडनचा दीर्घकालीन व्यावसायिक नात्यांमुळे आमची देशात देखील मजबूत पकड आहे.
Comments
Post a Comment