आज्जी निघाली शाळेला…

आज्जी निघाली शाळेला

जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित क्षितीज पटवर्धन लिखित दिग्दर्शित म मराठीचा म्हणत मराठीतील पहिलं  AI महाबालनाट्य “आज्जी बाई जोरात” ह्या नाटकाने मराठी रंगभूमीवर उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल केलीबालकांसोबतच पालकांनी सुद्धा आज्जीला आपलंसं केलंहसतगातनाचतबागडत आताच्या पिढीत मराठीची गोडी निर्माण केलीनिर्मिती सावंतअभिनय बेर्डेमुग्धा गोडबोलेअभिजीत केळकरजयवंत वाडकर यांसह ११ कलाकारांची मांदियाळी भरलेली दिसते. “आजच्या पिढीला मोबाईलच्या विश्वातून बाहेर काढून त्यांच्या हातात पुस्तकं पुन्हा येऊ घालत आहेत ते या नाटकामुळे” अशी अनेक मान्यवर आणि प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिली.

 

या नाटकामुळे ह्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुस्तकांचा खप सुद्धा वाढल्याची माहिती समोर आलीपरंतु आताच्या घडामोडींना पाहता आज्जीने प्रत्येक शाळांमध्ये जाऊन ही मराठीची गोडी निर्माण करण्याची वेळ आली आहेमहाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मराठीच सक्तीची नाही ही घटना अत्यंत दुःखद आहेएकीकडे मराठीला मिळणारा अभिजात भाषेचा दर्जा आणि दुसरीकडे तिला तिच्याच माहेरी बेदखल करण्याची प्रक्रिया... कुठेतरी आपण मराठी भाषिक म्हणून एक पाऊल उचललायला हवंपुढील पिढीला म मोबाईलचा सोडून म मराठीचा गिरवता यावा म्हणूनच आता आज्जी निघाली आहे शाळेतदिनांक ०६ जुलै २०२५ रोजी साने गुरुजी इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थीपालक आणि कर्मचाऱ्यांसाठी  दु४ वाजता यशवंत नाट्यमंदिरमाटुंगा येथे  “आज्जी बाई जोरात” या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

 

 या प्रयोगासाठी विद्यार्थीपालकशिक्षकेतर कर्मचारी यांसाठी सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेआज्जी घराघरात तर पोहचलीच आहे आता आज्जी सुद्धा नातवंडांसोबत निघाली आहे शाळेततुम्ही सुद्धा मराठीच्या ह्या सफरीत सहभागी व्हा आणि म मराठीचा गिरवूया...

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO