‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

 ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होतेअनेकदा आपल्याही नकळत. त्याला वयभाषाधर्मवर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ऑल इज वेल’ या  मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अमरअकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ऑल इज वेल चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. बेळगावकर असलेल्या निर्माते अमोद मुचंडीकर,वाणी हालप्पनवर  यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचेविनायक पट्टणशेट्टी आहेत. येत्या २७ जूनला ऑल इज वेल चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  सहकुटुंब अनुभवायला मिळणारी हास्याची मेजवानी असून ऑल इज वेल हा चित्रपट मनोरंजनाची अफलातून ट्रीट असणार आहे असा विश्वास निर्माते अमोद मुचंडीकर यांनी व्यक्त केला.

आनंदरागमनातील गुपितं व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असली की आयुष्य रंगतदार होतं हा आशय अधोरेखित करणाऱ्या ऑल इज वेल चित्रपटातून  प्रियदर्शन जाधवअभिनय बेर्डेरोहित हळदीकर हे जबरदस्त त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र आले  आहे. या तिघांसोबत चित्रपटात सयाजी शिंदेअभिजीत चव्हाणनक्षत्रा मेढेकरसायली फाटकमाधव वझेअजय जाधवअमायरा गोस्वामीदिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

मैत्रीसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या या तीन मित्रांच्या आयुष्यात अशा घटना घडतात कीत्यांच्या आयुष्यात खळबळ उडते. मात्र न डगमगता हे तीनही मित्र परिस्थितीला सामोरे जात एकत्र उभे ठाकतात. आपल्यातील मैत्री जपत फसवणुकीचा हे तीन मित्र कसा निकाल लावतातयाची धमाल दिग्दर्शक योगेश जाधव यांनी ऑल इज वेल’ चित्रपटामधून  दाखविली आहे.

ऑल इज वेल चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेशअर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊतगायिका अपेक्षा दांडेकर यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.

तरुणाईची कथा असलेला ऑल इज वेल हा चित्रपट कलाकारांचा सुरेख अभिनयसुमधूर संगीत आणि नेत्रसुखद सादरीकरणाने सजला आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO