'हृदयी प्रीत जागते' ही मालिका माझ्यासाठी खूप जवळची....

 'हृदयी प्रीत जागतेही मालिका माझ्यासाठी खूप जवळची आहे आणि संगीत हे एक कारण आहेपंकज विष्णू

झी मराठीवर 'हृदयी प्रीत जागते’  ही मालिका ७ नोव्हेंबरपासून रात्री ८ वा. प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.ह्या मालिकेत अभिनेता पंकज विष्णू आपल्याला मनोहर मामाच्या भूमिकेत दिसतोयपंकज गेले अनेक वर्षे मनोरंजन विश्वात काम करतोयजवळपास ६ - ७ वर्षे झी टीव्हीसाठी पवित्र रिश्ता या मालिकेत काम केले आणि ती मालिका खूप गाजली.  या मालिकेबद्दल व आपल्या प्रवासा बद्दल बोलताना पंकज म्हणाला कीमनोहरने त्याच्या मागील आयुष्यात खूप काही सहन केले आहेआणि त्याच्या आत खूप भावना दडवून ठेवल्या आहेतमनोहरने आपल्या आयुष्यात खूप तडजोड केली आहेया मालिकेत जशी प्रभास आणि वीणाची  प्रेमकथा तुम्ही अनुभवणार आहात  त्याच प्रमाणे मनोहरची देखील स्वतःची छुपी प्रेमकहाणी आहेजी आपण पुढे पाहणार आहोतत्यामुळे या मालिकेत मनोहरच्याही वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना पाहायला मिळतीलया मालिकेत बरेच ट्विस्ट आणि टर्न आपण पुढे पाहणार आहोतप्रेक्षकांसाठी ही प्रेम कथा खूपच भावेल याची मला खात्री आहे आणि प्रेक्षक नक्कीच त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करतील.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO