दबंग दुल्हनिया राजेशने आस्वाद घेतला छप्पन मिष्टान्नांचा!
दबंग दुल्हनिया राजेशने आस्वाद घेतला छप्पन मिष्टान्नांचा!
एण्ड टीव्हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये दबंग दुल्हनियाsmi राजेशची भूमिका साकारणारी कामना पाठक निस्सीम फूडी आहे. अभिनेत्रीला पर्यटनावर गेले असताना विविध स्थानिक मिष्टान्नांचा आस्वाद घ्यायला आवडते. तिचे मूळगाव इंदौरला तिची मागील ट्रिप यामध्ये अपवाद नव्हती. अभिनेत्रीने शहरातील सर्वात प्रसिद्ध छप्पन दुकानला भेट दिली. फूडप्रती आपल्या आवडीबाबत सांगताना कामना पाठक म्हणाली, ‘‘अरे दादा! खानो से हमारा रिश्ता सदा के लिए है (हसते). मी इंदौरची आहे, जे फूड सिटी म्हणून ओळखले जाते. नुकतेच, मी उज्जैनला भेट देऊन महाशिवरात्रीदरम्यान महाकाल ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये भगवान शिवचा आशीर्वाद घेतला. मी इंदौरला पोहोचताच माझे आवडते खाण्याचे ठिकाण छप्पन दुकानला भेट देऊन स्वत:ला माझ्या आवडत्या मिष्टान्नांचा आस्वाद घेण्यापासून रोखू शकले नाही. याबाबत खास बाब म्हणजे मी पहिल्यांदाच मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील राजेश म्हणून तेथे गेले होते. चाहत्यांनी माझे उत्साहात स्वागत केले आणि मी त्यांच्यासोबत अनेक फोटो काढले. मला दुकानदाराने छप्पन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी दिली. सुरूवातीला माझ्या मनात इतके खाद्यपदार्थ खाण्याबाबत शंका निर्माण झाली, पण मी त्यांचा आस्वाद घेण्यापासून थांबू शकले नाही. माझा हा निर्णय सार्थ ठरला, कारण मला काही स्वादिष्ट मिष्टान्नांचा आस्वाद घ्यायला मिळाले. मी सुरूवातीला थंडगार कोकोनट क्रशचा आस्वाद घेतला. त्यानंतर साबुदाणा खिचडी, पोहे, जिलेबी, हॉट डॉग, कुल्हड पिझ्झा, बेरी आइस्क्रीम, खोपरा पॅटीस, आलू टिक्की, आठ फ्लेवर्स असलेली पानीपुरी, रसगुल्ला यांचा आस्वाद घेतला. पण तंदूरी चाय आणि तर्किश आइस्क्रीमचा आस्वाद घेण्याचा मी सर्वाधिक आनंद घेतला.’’
अभिनेत्री जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाली, ‘‘मी येथील रस्त्यांवरून चालताना माझ्यासमोर जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि मला नॉस्टेल्जिक वाटले. आम्ही एकत्र जमून या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचो. पण आता भरपूर काही बदलले आहे. त्यावेळी फक्त छप्पन स्टॉल्स होते, ज्यामध्ये आता काही नवीन फूड स्टॉल्ससह शेकडोपर्यंत वाढ झाली आहे. माझे पोट भरलेले असताना देखील माझी आणखी काही मिष्टान्नांचा आस्वाद घेण्याची इच्छा होती. इंदौर व माझ्या घराला भेट दिल्याने मला खूप आनंद होतो, पण यावेळी हा आनंद खास होता, कारण मी मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील राजेश म्हणून भेट दिली होती.’’
कामना पाठकला राजेशच्या भूमिकेत पाहण्यासाठी पहा ‘हप्पू की उलटन पलटन’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर
Comments
Post a Comment