कॅप्री ग्लोबल कॅपिटल..

कॅप्री ग्लोबल कॅपिटलचे नवीन ब्रँड कॅम्पेन “फर्ज निभाते हैं”मध्ये गुजरात टायटनचे खेळाडू सहभागी

मुंबई, 4 एप्रिल 2024: कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडही अग्रगण्य बँकिंग-एतर वित्तीय कंपनी आणि आयपीएल मोसमातील टीम गुजरात टायटनची स्पॉन्सर असून त्यांच्या वतीने ब्रँड फिल्मची नवीन मालिका “फर्ज निभाते हैं” लॉन्च करण्यात आली. या कॅम्पेनमध्ये गुजरात टायटन संघाचा कर्णधार शुभमन गिल समवेत त्याचे इतर सहकारी राहुल तेवतिया आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मा झळकणार आहेत. ग्राहक प्राधान्य आणि आपल्या अमूल्य सेवाधारकांना सुविधा देण्यात तत्पर कॅप्री लोन्सची प्रमुख नीतिमूल्ये या कॅम्पेनच्या माध्यमातून अधोरेखित होणार आहेत.  

या बँकिंग-एतर वित्तीय संस्था (एनबीएफसी)ने गुजरात टायटन संघाच्या सदस्यांनी व्यक्तींशी आणि त्यांच्या शाखेतील कॅप्री लोन्सच्या रिलेशनशीप मॅनेजरसमवेत विविध परिस्थिती आणि परस्परसंवादाचे सादरीकरण तीन मनोरंजक आणि छोट्या आकाराच्या जाहिरातपट मालिकांच्या माध्यमातून तयार केले. पहिल्या जाहिरातीत कर्जदाराला त्याच्या गोल्ड लोनवर मिळणारी कर्जाच्या परतफेडीची लवचिकता अधोरेखित होते. दुसऱ्या जाहिरातीमध्ये संघ आणि त्याचा चालक यांच्यातील मजेदार संवादाचे वर्णन पाहायला मिळेलज्यामध्ये निष्ठावंत ग्राहकांसाठी कॅप्री लोन्सवर विना-अडथळा कर्जाचा अर्ज आणि किमान दस्तऐवजीकरण प्रक्रिया अधोरेखित करण्यात आली आहे. तर तिसरा जाहिरातपट हा कॅप्री कर्ज शाखेत ग्राहकाला प्राधान्य मानून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवेवर प्रकाश टाकतो.

ही कॅम्पेन एप्रिल 2024 रोजी या आयपीएल मोसमात विविध डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल. तुमच्या संदर्भासाठी जाहिरातीची लिंकः https://youtu.be/XpeFxnDGxEo

कॅप्री ग्लोबलचे ग्रुप चीफ मार्केटिंग ऑफिसर बसंत धवन म्हणाले कीफर्ज निभाते हैं मोहीम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहेही आमच्या ग्राहकांना अनुकरणीय सेवा प्रदान करण्यासाठी आमचे अतूट समर्पण आणि वचनबद्धता अधोरेखित करते. "आजच्या वेगवान जगातसोयीस्कर आणि सुलभ आर्थिक उपाय प्रदान करण्याचे महत्त्व आम्हाला समजते. या कॅम्पेनच्या माध्यमातून आणि गुजरात टायटन्सच्या भागीदारीतकॅप्री लोन्स आपल्या अद्वितीय उत्पादन प्रस्तावांसह ग्राहकांच्या गरजांना कसे प्राधान्य देते हे दर्शविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. चित्रपटांमध्ये गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी दिलेले ब्रँड मेसेजिंग आम्हाला ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यास आणि ब्रँड विश्वास निर्माण करण्यास मदत करेल". 

अशाच भावना व्यक्त करतानारेडिफ्यूजन ब्रँड सोल्यूशन्सचे नॅशनल क्रिएटीव्ह डायरेक्टर प्रमोद शर्मा म्हणाले, "या कॅम्पेनकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोन ग्राहकांप्रती कॅप्री लोन्सच्या वर्तनाची सत्यता आणि सहानुभूतीवर आधारित आहे. प्रत्येक व्हिडिओ एक अशी परिस्थिती दर्शवितोजिच्यासोबत आमच्या कॅप्री लोन्सच्या सेवा आणि विस्तृत श्रेणीची पत उत्पादनांचा लाभ घेतलेल्या किंवा घेणाऱ्या प्रेक्षकांची नाळ तंतोतंत जुळते. आम्हाला कर्तव्य भावनेचा एक अतिशय मजबूत संदेश द्यायचा होताहा संदेश अतिशय तरल पद्धतीने ब्रँडच्या दैनंदिन आचरणात कायम दिसतो! हा स्टोरीबोर्ड तयार करण्यात हेच मोठे आव्हान होते. प्रेक्षक त्यांच्या आवडत्या गुजरात टायटन्सचा जयजयकार करताना त्यांना हा स्टोरीबोर्ड पसंत पडेल आणि ते कौतुकही करतील".  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight