“परंपरा” चित्रपटातील मिलिंद शिंदे यांच्या कामाचे रसिकांकडून कौतुक

प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा “परंपरा” हा लक्षणीय चित्रपट 26 एप्रिलला प्रदर्शित झाला. तब्बल 100 स्क्रीन्ससह हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी दादरच्या प्लाझा येथे या सिनेमाचा प्रिमीयर धडाक्यात पार पडला. यावेळी मिलिंद शिंदे, जयराज नायर आणि अरुण कदम यांच्यासह या सिनेमातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ हजर होते.
समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या सिनेमात दाखवण्यात आला आहे. उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी दणक्यात प्रतिसाद दिला होता.

हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टारगेट मुव्हीज या बॅनर अंतर्गत “परंपरा” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांनी केले आहे. प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे आणि हरहुन्नरी अभिनेत्री वीणा जामकर यांच्या यात प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण घाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांच्याही भूमिका पाहायला मिळतात.
चित्रपटाची पटकथा प्रणय निशाकांत तेलंग आणि संजय सावंत यांनी लिहिली असून छायाचित्रण निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना आनंद मेनन यांचे मधूर संगीत दिले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे.
Comments
Post a Comment