नवोन्मेषाचा आनंद घेऊन रंगला 'चिरायू’

नवोन्मेषाचा आनंद  घेऊन रंगला  'चिरायू

'चैत्र शुद्ध प्रतिपदाम्हणजेच ‘गुढीपाडवा उत्साहाने आणि उमेदीने साजरे करण्याची आपली परंपरा आहे. मराठी मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही.  नवनवे संकल्प आणि कार्य-प्रकल्पांसोबत मनोरजंनाची गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत चिरायूतर्फे दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दणक्यात साजरं केलं जातं. यंदाही गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठीच्या वतीने  नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. 'चिरायू २०२४' साठी अवघं मराठी कलाविश्व एकवटलं होतं. 

शेलार मामा फाऊंडेशन’ आणि प्लॅनेट मराठीच्या वतीने आयोजित चिरायू २०२४ चे वैशिष्ट्य म्हणजे नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल चिरायू’ च्या मंचावर आवर्जून घेतली गेली. कलेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सतीश लिंगाप्पा खवतोडे (कपडेपट)देविदास दरवेशी  (नेपथ्य)डॉ. खुशाले (रुग्णसेवा),  रेखा सावंत (केशभूषा) यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यंदाच्या या  सोहळ्यात रील स्टार्स रोहित मावळे  (फूड व्लागर),  आरजे प्रणित (स्टंड अप कामेडी)रोहन पाटकर (वाईल्ड लाईफ फोटोग्राफी),  वैष्णवी नाईक (फॅशन एंड लाईफस्टाईल) सुमन धामणे आजी  (खाद्यपदार्थ/ फूड) यांचाही गौरव करण्यात आला. श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या सायलीरुद्रहंसिका या लहानग्यांनी सुरेख गुढ्यांची निर्मिती केल्याबद्दल त्यांचं खास कौतुक चिरायू च्या मंचावर करण्यात आलं.  

याप्रसंगी बोलतानाचिरायूचे सुशांत शेलार यांनी सांगितले की, ‘नव्या उमेदीने आम्ही नववर्षाची सुरुवात करीत असून मनोरंजनाच्या माध्यमातून कलेचा वसा समृद्धपणे जपण्याचा तसेच  मराठी सृष्टीला नाविन्याचा आयाम देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. वीणा ग्रुपमुंबई बीट्सनील ग्रुपसमर्थ व्हिजन हे यंदाच्या 'चिरायू २०२४' चे प्रायोजक होते.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO