'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

'इलू इलूम्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

दिमाखदार सोहळ्यात पहिली झलक आली समोर 

एकीकडे  मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेततर दुसरीकडे बॅाक्स आॅफिसवर काही मराठी चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहेतत्यामुळे हिंदीपासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले पहायला मिळत आहेत. यात आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री एली आवराम हे नाव देखील सामील झालं आहे. एव्हाना बॉलीवूड मध्ये आपला चांगला जम बसवलेली एली इलू इलू या मराठी चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित इलू इलू मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा रंगतदार टिझर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील इलू इलू या रोमँटिक गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स करत एली आवरामने उपस्थितांची मने जिंकली.

२०१३ मध्ये 'मिकी व्हायरसया चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एलीनं आजवर 'किस किस को प्यार करूं', 'नाम शबाना', 'पोस्टर बॅाईज', 'बाझार', 'मलंग', 'कोई जाने ना', 'गुडबायया हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. 'इलू इलू' या मराठी चित्रपटात एली मिस पिंटो या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण हि व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीनं खूप मेहनत घेतली आहे. आपल्याला अवगत नसलेल्या भाषेतील चित्रपटातील मुख्य भूमिका तिनं मोठ्या धाडसानं आणि आत्मविश्वासानं साकारल्याचं चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जाणवेल.

मराठीत एन्ट्री करण्याबाबत एली म्हणाली की, ‘मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. स्वीडीशहिंदीतामिळ आणि कन्नड चित्रपटांनंतर 'इलू इलू' च्या निमित्तानं मराठी भाषेची गोडी चाखण्याची संधी मिळाली आहे. यातील कॅरेक्टर माझ्या आजवर साकारलेल्या व्यक्तीरेखांपेक्षा खूप वेगळं आहे. एका नव्या लुकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुरुवातीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा थोडं दडपण जाणवलं होतंपण पटकथा आणि कॅरेक्टर समजल्यावर मराठीत एंट्री करण्यासाठी हीच अचूक संधी असल्याची जाणीव झाल्यानं होकार दिल्याचंही एली म्हणाली.

मराठमोळ्या रूपातील एलीला पाहण्यासाठी मराठी प्रेक्षकांसोबतच तिचे चाहतेही आतुरले आहेत. 

एलीसोबत वीणा जामकरआरोह वेलणकरमीरा जगन्नाथवनिता खरातश्रीकांत यादवकमलाकर सातपुतेआनंद कारेकरनिशांत भावसारअंकिता लांडेगौरव कलुस्तेयश सणससोहम काळोखेआर्या काकडे-जोशीसिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत.

इलू इलू चित्रपटाची कथापटकथासंवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशीवैभव देशमुखप्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्तेऋषिकेश रानडेआर्या आंबेकररोहित राऊतजनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडेविजय गवंडे  यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

इलू इलू ३१ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight